मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

 --- बोरगाव मंजू येथील ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आमदार रणधीर सावरकर यांची पाहणी अकोला, दि. 05 ऑगस्ट 2026 : अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू येथे ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. या कामाची पाहणी मा. आमदार श्री. रणधीरभाऊ सावरकर यांनी परिसरातील नागरिकांसोबत जाऊन केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या प्रसंगी पंकज वाडीवाले, राजू गमे, सुबोध गवई, बंटी मांगे, भटकर, देशमुख, जयकुमार ठोकळ, प्रवीण हगवणे, महेंद्र काळे, ढंगारे , गिरी, रवी काटे तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार सावरकर म्हणाले   "अकोला तालुक्यातील बोरगाव मंजूला पंचक्रोशीत महत्त्वाचे स्थान आहे. या भागातील नागरिक आरोग्य सुविधांपासून वंचित राहू नयेत यासाठी विशेष निधी उपलब्ध करून मी या ग्रामीण रुग्णालयाचे काम सुरू केले होते. आज ते काम अंतिम टप्प्यात आले आहे. पंचक्रोशीतील जनतेला चांगल्या दर्जाची आरोग्य सुविधा मिळावी हाच उद्देश आहे." "एक सुरेख आणि दर्जेदार रुग्णालय या भागातील नागरिकांना मिळावे यासाठी मी अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर...

ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनेची कामे तातडीने पूर्ण करा : आमदार रणधीर सावरकर यांचे मजीप्राला निर्देश

 



अकोला : ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करा तसेच यावर्षी अतिवृष्टीमुळे ज्या ठिकाणी पाणी पुरवठा योजनेचे नुकसान झालेले आहे त्याची दुरुस्ती सुद्धा तातडीने करा असे निर्देश आमदार रणधीर सावरकर यांनी दिले. आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरण च्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.


 वाढती लोकसंख्या आणि जुनी झालेली पाणी वितरण व्यवस्था लक्षात घेता शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याच्या योजना नव्याने बांधकामाधीन आहे. खारपाणपट्ट्यातील खांबोरा ६० गावे , ग्रामीण पाणी पुरवठा योजना व योजनेतील वितरण व्यवस्थेमध्ये नवीन पाईप लाईन तसेच उंच टाक्या व सुधारित वितरण प्रणाली टाकण्याचे काम सुरू आहे. या योजनेच्या कामाच्या प्रगतीचा आढावा मजीप्राचे अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात आज आमदार सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. 


बैठकीच्या सुरुवातीला आमदार सावरकरांनी यापूर्वीच्या बैठकीमध्ये देण्यात आलेल्या सूचनाबाबत काय कारवाई केली याची विचारणा केली. बऱ्याच ठिकाणी पाण्याचा डिस्चार्ज वाढल्यामुळे वितरण व्यवस्थेवर एअर व्हॉल्व बसविणे गरजेचे आहे असे असतांना अंदाजपत्रकात याबाबत पुरेशी तरतूद केली नसल्याने आमदार सावरकरांनी नाराजी व्यक्त केली. तसेच मागील बैठकीत पळसो झोन मधील वितरण व्यवस्था चाचणी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या त्याचे सुद्धा पालन झाल्याचे दिसून न आल्याने आमदार सावरकरांनी अधिकाऱ्यांप्रती नाराजी व्यक्त केली. 


चाचोंडी गावामध्ये उंच टाक्यांची बांधकाम तसेच पाईपलाईनचे जाळे टाकण्याकरिता खोदून ठेवलेले रस्ते दुरुस्त करण्यात आले नाहीत. यावेळी चाचोंडी येथील ग्रामस्थ बैठकीमध्ये उपस्थित झाले असता सदरचे रस्ते तातडीने दुरुस्त करा तसेच खोदलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीकरिता अंदाजपत्रकात तरतूद नाही त्यामुळे अशा चुकीच्या अंदाजपत्रकाबाबत दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना आमदार सावरकरांनी दिल्या. बैठकी करिता अलीयाबाद, चाचोंडी येथील ग्रामस्थ अकोला भाजपाचे शहर प्रमुख जयंत मसणे विवेक भरणे आदि पदाधिकारी उपस्थित होते. अधीक्षक अभियंता मजिप्रा मंडळ अकोला, निलेश राठोड कार्यकारी अभियंता मजीप्रा विभाग अकोला, चौधरी उपअभियंता मजिप्रा, श्रीमती उमाळे उपअभियंता जिल्हा परिषद अकोला, निखिल राऊत उपकार्यकारी अभियंता मजिप्रा ,दीपक मेहरे शाखा अभियंता, नवले शाखा अभियंता जि प अकोला, कंत्राटदार व प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांचे प्रतिनिधी बैठकीत उपस्थित होते.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट