मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

 --- बोरगाव मंजू येथील ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आमदार रणधीर सावरकर यांची पाहणी अकोला, दि. 05 ऑगस्ट 2026 : अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू येथे ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. या कामाची पाहणी मा. आमदार श्री. रणधीरभाऊ सावरकर यांनी परिसरातील नागरिकांसोबत जाऊन केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या प्रसंगी पंकज वाडीवाले, राजू गमे, सुबोध गवई, बंटी मांगे, भटकर, देशमुख, जयकुमार ठोकळ, प्रवीण हगवणे, महेंद्र काळे, ढंगारे , गिरी, रवी काटे तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार सावरकर म्हणाले   "अकोला तालुक्यातील बोरगाव मंजूला पंचक्रोशीत महत्त्वाचे स्थान आहे. या भागातील नागरिक आरोग्य सुविधांपासून वंचित राहू नयेत यासाठी विशेष निधी उपलब्ध करून मी या ग्रामीण रुग्णालयाचे काम सुरू केले होते. आज ते काम अंतिम टप्प्यात आले आहे. पंचक्रोशीतील जनतेला चांगल्या दर्जाची आरोग्य सुविधा मिळावी हाच उद्देश आहे." "एक सुरेख आणि दर्जेदार रुग्णालय या भागातील नागरिकांना मिळावे यासाठी मी अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर...

नियमित योगासने करा : डॉ. सुभाष लव्हाळे

 


अकोला - निरोगी आरोग्य राखण्यासाठी नियमित योगासने करा असा सल्ला डॉक्टर सुभाष लव्हाळे यांनी दिला.स्थानिक नाना मंगलम मंगल कार्यालय येथे इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन व गुड मॉर्निंग ग्रुप अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिवस शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

शिबिरामध्ये 100 चे वर योग साधकांनी प्रत्यक्ष भाग घेऊन शिबिराचा लाभ घेतला.



योग शिबिरामध्ये इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनचे कॉर्डिनेटर योगाचार्य डॉ सुभाष लव्हाळे, गुड मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष डॉ अशोक ओळंबे, कर्ता हनुमान मंडळाचे अध्यक्ष माजी सैनिक सुभाष पाटील म्हैसने, सौं नंदा निचळ, डॉ गजानन धरमकर, विलास आगरकर, श्रीमती लता वानखडे, सौ प्रतिभा अवचार यांनी योग संबंधी माहिती देऊन योग साधकांकडून योगाचे प्रात्यक्षिके करून घेतली. याप्रसंगी योग 21 जून पुरते सीमित न ठेवता नियमित पणे करावे असे आवाहन उपस्थितांना आपला माणूस डॉ अशोक ओळंबे यांनी केले.

तर गेल्या वीस वर्षापासून नियमितपणे योग शिबिर कर्ता हनुमान मंडळाच्या वतीने घेण्यात येत असल्याचे माजी सैनिक सुभाष पाटील म्हैसने यांनी सांगितले.

 गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने दिनकरराव घोडेराव, गजानन गोलाईत, अरुण मानकर, किशोर वडतकर, संतोष काटे, दत्ता भुसारी, प्रशांत बानोले, अड संतोष गोळे, डॉ राजेश वर्धेकर यांनी योग शिक्षक व शिक्षिका यांचे स्वागत करून आभार मानले. 

कार्यक्रमाला रेवत खाडे, अर्जुन जाधव गोपाल दांडगे, विवेक यादगिरे, प्रवीण कदम अड प्रवीण सोनी, वसंत जlयदे, राजेंद्र जोशी, ललिता तराळे, सुनंदा पुरी, हरीश गंगावते, गजानन माळी, शैलेंद्र सिसोदिया, हिम्मतराव पोहरे, महादेव खरसाळे, संजय वैद्य , लक्ष्मण मोरे, चिकटे काका, अनुराग आठवले, सुरेश वाडकर, मुरलीधर आवटे, चंद्रकांत ताठे, प्रल्हाद शेळके, शरद लवटे प्रकाश कुलट, विलास वानखडे, भिकाजी भगत, अशोक भिलकर, मीरा ढोरे, निर्मला टेकाडे, सुमिती राऊत, रजनी पोहरे विजुताई लव्हाळे, पंचफुला पाथरीकर, शीला मगर, किरण वादेकर, मनोरमा येवले,रेखा जयस्वाल, रामेश्वर राठोड, अर्जुन जाधव, गोपाळ दांदळे यांचेसह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट