मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

भर उन्हात जनगणना प्रशिक्षण प्रशिक्षणार्थींचे हाल, मनपाचा ढिसाळ कारभार

                              विशाल पुरंदरे   अकोला : शहरातील जनगणना करण्यासाठी शिक्षक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक तसेच शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना सध्या प्रशिक्षण देणे सुरू आहे. प्रचंड तापमान असतानाही सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत उन्हाच्या वेळी प्रशिक्षण ठेवल्याने कर्मचाऱ्यांच्या जीवाची लाही लाही होत आहे. सध्या अकोला महापालिका दक्षिण झोन अंतर्गत स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये जवळपास 100 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. काही प्रशिक्षणार्थीं ची एसी हॉलमध्ये व्यवस्था असल्याने त्यांना अजिबात त्रास नाही. मात्र इतर प्रशिक्षणार्थींची व्यवस्था वरच्या मजल्यावर करण्यात आली, त्यामुळे प्रशिक्षणार्थींना दिवसभर घामाच्या धारा लागल्या.  दोन कुलर केवळ नावापुरता ठेवले होते. दोन्ही कुलर आपोआप बंद पडले. एवढेच काय तर ठेवलेल्या खुर्च्या मध्ये शिक्षक बसल्यानंतर जुन्या खुर्च्या तुटून शिक्षक खाली पडले. दुपारी प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केल्यानंतर अखेर एक टेक्निशियन पाठविण...

गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर अकोला अर्बन बँकेची कौतुकाची थाप

 



अकोला – शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा उत्साहवर्धन करण्याच्या हेतूने दि अकोला अर्बन को-ऑप. बँक (The Akola Urban co- op Bank Ltd, AKOLA) यांच्या वतीने शालांत परीक्षेत शाळास्तरावर प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा उत्साहात पार पडला. 


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष शंतनू जोशी यांच्या सह बँकेचे संचालक संजय कोटक, दिपक मायी, बँकेचे संचालक व प्रमुख वक्ते शार्दूल दिगंबर, मुख्य कार्यकारी अधिकारी राजन सोनटक्के, उपमुख्य कार्यकारी विनोद अग्रवाल उपस्थित होते.


प्रास्ताविकात राजन सोनटक्के यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक स्पर्धा निर्माण व्हावी, त्यांच्या कष्टाचे कौतुक व्हावे यासाठी बँकेने पुढाकार घेतला आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे सांगितले. प्रमुख वक्ते शार्दूल दिगंबर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मनुष्याच्या जीवनात १२ वर्षानी खरे यश मिळविण्यास सुरवात होते. आपण शाळेत प्रवेश घेतल्यापासून १२ वर्षानी १० वी चा पहिलं टप्पा येतो. इथे जे यश मिळते तिथून विद्यार्थांचे जग विस्तारत जाते. पुढे त्यांनी जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर महापूरषांचे चरित्र वाचन करणे गरजेचे आहे. त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन समर्पण, संकल्प, त्याग व देशसेवेचा वसा आपण घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. 


बँकेच्या मुख्य कार्यालयात आयोजित या कार्यक्रमास अकोला शहरातील २५ शाळांमधून प्रथम, द्वितीय आलेले ५६ गुणवंत विद्यार्थी, मुख्याध्यापक त्यांचे पालक, शिक्षकवृंद तसेच बँकेचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “हा सन्मान आमच्या पुढील शिक्षण प्रवासात अधिक प्रेरणा देणारा आहे.” पालक आणि शिक्षकांनीही बँकेच्या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश जोशी यांनी केले तर आभारप्रदर्शन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजन सोनटक्के यांनी मानले.

टिप्पण्या