मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

  डाबकी रोड रुंदीकरणाचे काम योग्य रीतीने करा अन्यथा शिवसेना स्टाईलने... गेल्या 18 महिन्यापासून डाबकी रोड रुंदीकरणाचे काम कसे सुरू आहे हे आपल्या अधिकाऱ्यांनी कधी पहिले आहे का असा रोखठोक प्रश्न शिवसेना नेते डॉक्टर अशोक ओळंबे यांनी मनपा आयुक्त सुनील लहाने यांना विचारला आहे. कारण डाबकी रोड रुंदीकरणाचे काम 18 महिन्यांपासून अर्धवट असून ज्या ठिकाणी होत आहे त्याचे दोन्ही बाजूला रस्ता 3 मीटर, पाणी पुरवठा लाईन, नंतर इलेक्ट्रिक केबल आणि नाली असे काम होत आहे. त्यांनतर पाईप लाईन वर पेव्हर बसविण्याचे काम सुरु आहे. आणि त्याचे खाली सुध्दा काँकरीट टाकून वरून पेंव्हर टाकण्याचा अजब प्रकार सुरू आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग ची मूळ जबाबदारी मनपाची आहे. मात्र स्वतः योग्य रीतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग न करता नागरीकांना ब्रह्मज्ञान सांगणे  कितपत योग्य आहे. आपण पेव्हर खाली काँकरीट बसविण्याचे काम थांबविण्याचे आदेश संबंधित अधिकारी, ठेकेदार यांना त्वरित द्यावे. अन्यथा शिवसेना स्टाईलने पुढील पाऊल उचलू, असा रोखठोक इशारा डॉक्टर अशोक ओळंबे यांनी दिला आहे.

पंढरपूर साठी विशेष ट्रेन सुरू करा : खा. अनुप धोत्रे

 


अकोला : आषाढी एकादशी निमित्त अकोला पंढरपूर विशेष ट्रेन सुरू करावी अशी मागणी दक्षिण मध्य रेल्वे व मध्य रेल्वे यांच्याकडे खासदार अनुप धोत्रे यांनी केली आहे. 


नागपूर पंढरपूर, अमरावती पंढरपूर खामगाव पंढरपूर या गाड्या मध्य रेल्वेने सुरू केल्या असून येणे जाणे सात गाड्या पंढरपूर साठी सुरू झाल्या आहेत. परंतु गेल्या वर्षी आपल्या मागणीची दखल घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने अकोला

वाशिम बार्शी टाकळी कडे वारकऱ्यांसाठी पंढरपूर विशेष ट्रेन दोन गाड्या सोडल्या होत्या त्याच धर्तीवर यंदा सुद्धा गाड्या सुरू करण्यात याव्या अशी मागणी मुख्य प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे यांच्याकडे खासदार धोत्रे यांनी केली आहे तसेच या संदर्भात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सुद्धा राज्यभरातून पंढरपूर साठी विशेष ट्रेन सुरू करून भक्तांना सुविधा दिल्या आहेत, याच धरतीवर अकोल्यावरून पंढरपूर साठी दोन गाड्या सुरू कराव्या अशी मागणी खासदार धोत्रे यांनी केली आहे.

टिप्पण्या