मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

  डाबकी रोड रुंदीकरणाचे काम योग्य रीतीने करा अन्यथा शिवसेना स्टाईलने... गेल्या 18 महिन्यापासून डाबकी रोड रुंदीकरणाचे काम कसे सुरू आहे हे आपल्या अधिकाऱ्यांनी कधी पहिले आहे का असा रोखठोक प्रश्न शिवसेना नेते डॉक्टर अशोक ओळंबे यांनी मनपा आयुक्त सुनील लहाने यांना विचारला आहे. कारण डाबकी रोड रुंदीकरणाचे काम 18 महिन्यांपासून अर्धवट असून ज्या ठिकाणी होत आहे त्याचे दोन्ही बाजूला रस्ता 3 मीटर, पाणी पुरवठा लाईन, नंतर इलेक्ट्रिक केबल आणि नाली असे काम होत आहे. त्यांनतर पाईप लाईन वर पेव्हर बसविण्याचे काम सुरु आहे. आणि त्याचे खाली सुध्दा काँकरीट टाकून वरून पेंव्हर टाकण्याचा अजब प्रकार सुरू आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग ची मूळ जबाबदारी मनपाची आहे. मात्र स्वतः योग्य रीतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग न करता नागरीकांना ब्रह्मज्ञान सांगणे  कितपत योग्य आहे. आपण पेव्हर खाली काँकरीट बसविण्याचे काम थांबविण्याचे आदेश संबंधित अधिकारी, ठेकेदार यांना त्वरित द्यावे. अन्यथा शिवसेना स्टाईलने पुढील पाऊल उचलू, असा रोखठोक इशारा डॉक्टर अशोक ओळंबे यांनी दिला आहे.

गुप्त नवरात्री 26 जून पासून



अकोला-: या आषाढ शुक्ल पक्ष प्रतिपदेपासून (26 जून) गुप्त नवरात्र आरंभ होत आहे. या नवरात्राचे अभिजीत मुहूर्त सकाळी 11.41 पासून 12:29 पर्यंत राहील. या मुहूर्त अंतर्गत आपण घटस्थापना करू शकता.


देवशयनी पंढरपुरी एकादशी-: रविवार सहा 6 जुलै रोजी राहील, या एकादशीपासून सर्वच शुभ कार्य वर्जित असतात. चार महिन्यापर्यंत चातुर्मास लागते.


स्वयं सिद्ध मुहूर्त-: या मुहूर्ताला अबूज मुहूर्त पण म्हणतात. चातुर्मास असो, गुरु शुक्र अस्त असो किंवा मृत्यू स्थानी कोणताही ग्रह असो स्वयंसिध्द मुहूर्त वर सर्व शुभ कार्य करावे, स्वयंसिद्ध मुहूर्तां संबंधित माहिती सम्राट पंचांग जयपुर, जय विनोदी जयपूर पंचांग मध्ये दिलेली आहे.


स्वयं सिद्ध मुहूर्त याप्रमाणे 1) चैत्र शुक्ल प्रतिपदा. 2) रामनवमी. 3) अक्षय तृतीया. 4) जानकी नवमी. 5) पीपल पौर्णिमा. 6) गंगा दशमी. 7) निर्जला एकादशी. 8) आषाढ शुक्ल नवमी 4जुलई 2025. 9) जन्माष्टमी 16 अगस्ट.10) गोगा नवमी 17 ऑगस्ट,11) श्री गणेश चतुर्थी 27 ऑगस्ट.12) परिवर्तनी जल झूलनीएकादशी 3 सप्टेंबर.13) वामन द्वादशी 4 सप्टेंबर.14) दसरा 2 ऑक्टोबर.


15) धनतेरस 18 ऑक्टोबर.16) दीपावली 21 ऑक्टोबर.17) प्रबोधनी एकादशी 2 नोव्हेंबर.18) श्रीराम जानकी विवाह 25 नोव्हेंबर.19) वसंत पंचमी 23 जानेवारी 2026,20) फुलेरा दूध 19 फेब्रुवारी.21) शीतला अष्टमी 11मार्च. या स्वयं सिद्ध मुहूर्त मध्ये वास्तु शांती ही करता येते.


मिथ्या भ्रम -: जर आश्विन नवरात्री नवमी तिथीला कुटुंबात कोणाचा मृत्यू झाला तर ती तिथि जीवनभरपर्यंत आड येते साजरी करू शकत नाही हा एकदम मिथ्या भ्रम आहे. वार्षिक श्राद्ध पर्यंत कोणताही सण साजरा करता येत नाही. वार्षिक श्राद्ध झाल्यानंतर सगळेच सण पूर्ववत करता येतात.


 सिटी कोतवाली येथील बालाजी मंदिर मध्ये अकोला पुरोहित संघांची सभा घेण्यात आली सभेमध्ये सर्वश्री पंडित लाला तिवारी, सुमित तिवारी, आलोक शर्मा, प्रमोद तिवारी, भैरव शर्मा, श्याम अवस्थी, रतन तिवारी व पंडित रवी कुमार शर्मा प्रामुख्याने उपस्थित होते.

टिप्पण्या