मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

  डाबकी रोड रुंदीकरणाचे काम योग्य रीतीने करा अन्यथा शिवसेना स्टाईलने... गेल्या 18 महिन्यापासून डाबकी रोड रुंदीकरणाचे काम कसे सुरू आहे हे आपल्या अधिकाऱ्यांनी कधी पहिले आहे का असा रोखठोक प्रश्न शिवसेना नेते डॉक्टर अशोक ओळंबे यांनी मनपा आयुक्त सुनील लहाने यांना विचारला आहे. कारण डाबकी रोड रुंदीकरणाचे काम 18 महिन्यांपासून अर्धवट असून ज्या ठिकाणी होत आहे त्याचे दोन्ही बाजूला रस्ता 3 मीटर, पाणी पुरवठा लाईन, नंतर इलेक्ट्रिक केबल आणि नाली असे काम होत आहे. त्यांनतर पाईप लाईन वर पेव्हर बसविण्याचे काम सुरु आहे. आणि त्याचे खाली सुध्दा काँकरीट टाकून वरून पेंव्हर टाकण्याचा अजब प्रकार सुरू आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग ची मूळ जबाबदारी मनपाची आहे. मात्र स्वतः योग्य रीतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग न करता नागरीकांना ब्रह्मज्ञान सांगणे  कितपत योग्य आहे. आपण पेव्हर खाली काँकरीट बसविण्याचे काम थांबविण्याचे आदेश संबंधित अधिकारी, ठेकेदार यांना त्वरित द्यावे. अन्यथा शिवसेना स्टाईलने पुढील पाऊल उचलू, असा रोखठोक इशारा डॉक्टर अशोक ओळंबे यांनी दिला आहे.

164 गुणवंत प्रशांत प्रतिभा पुरस्काराने सन्मानित





अकोला : माजी नगराध्यक्ष हरीश भाई आलिमचंदानी यांच्या पुढाकाराने तसेच थैलेसीमिया सोसायटीच्या सहकार्याने सिंधी समाजातील 164 गुणवंत विद्यार्थ्यांसह, विविध मान्यवरांचा प्रशांत प्रतिभा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. डॉक्टर इंजिनिअर सह इतर सत्कारमूर्तींना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी नागपूर शहराचे डीसीपी रोहित मतानी यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले. 

कार्यक्रमाची प्रस्तावना श्री हरीशभाई आलिमचंदानी यांनी केली. उदय अकादमी नागपुर येथील प्रताप देवानी, मोटवानी आणि कारंजा लाड़ येथील विजय नागवानी यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले. विविध पंचायत प्रमुख यांच्यासह सिंधी समाजाचे अध्यक्ष

रमेशलाल जग्यासी, डॉ बी एल विरवानी, एड. कन्हैयालाल संतानी, सुरेशसेठ संतानी, शमणिभाई जसमतिया, मनोहरलाल पंजवानी, सुरेश लालवानी, विनय लालवानी, हीरालाल कृपलानी, धीरज बसंतवाणी, प्रकाश आनन्दानी, नन्दलाल आलिमचंदानी, संतोष वाधवानी, मुरलीधर आलिमचंदानी, जयपाल वीरवानी,आर्किटेक्ट ईश्वर आनंदानी, सुनील थावरानी, मुकेश आलिमचंदानी उपस्थित होते. या कार्यक्रमात मेरिटमध्ये आलेल्या बारा विद्यार्थ्यांना सुरेश लालवानी यांच्यातर्फे घड्याळ भेट देण्यात आली. आशा मूवीज, संजय मोतियानी यांच्यातर्फे भेटवस्तू देण्यात आल्या. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुरुनानक विद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मधुर कमल आलिमचंदानी, श्रीमती कांता हरिश आलिमचंदानी, श्रीमती निशा मुकेशलाल आलिमचंदानी यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पण्या