मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

  डाबकी रोड रुंदीकरणाचे काम योग्य रीतीने करा अन्यथा शिवसेना स्टाईलने... गेल्या 18 महिन्यापासून डाबकी रोड रुंदीकरणाचे काम कसे सुरू आहे हे आपल्या अधिकाऱ्यांनी कधी पहिले आहे का असा रोखठोक प्रश्न शिवसेना नेते डॉक्टर अशोक ओळंबे यांनी मनपा आयुक्त सुनील लहाने यांना विचारला आहे. कारण डाबकी रोड रुंदीकरणाचे काम 18 महिन्यांपासून अर्धवट असून ज्या ठिकाणी होत आहे त्याचे दोन्ही बाजूला रस्ता 3 मीटर, पाणी पुरवठा लाईन, नंतर इलेक्ट्रिक केबल आणि नाली असे काम होत आहे. त्यांनतर पाईप लाईन वर पेव्हर बसविण्याचे काम सुरु आहे. आणि त्याचे खाली सुध्दा काँकरीट टाकून वरून पेंव्हर टाकण्याचा अजब प्रकार सुरू आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग ची मूळ जबाबदारी मनपाची आहे. मात्र स्वतः योग्य रीतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग न करता नागरीकांना ब्रह्मज्ञान सांगणे  कितपत योग्य आहे. आपण पेव्हर खाली काँकरीट बसविण्याचे काम थांबविण्याचे आदेश संबंधित अधिकारी, ठेकेदार यांना त्वरित द्यावे. अन्यथा शिवसेना स्टाईलने पुढील पाऊल उचलू, असा रोखठोक इशारा डॉक्टर अशोक ओळंबे यांनी दिला आहे.

अमरावती विभागात बारावीच्या निकालात अकोला येथील डवले कॉलेज अग्रेसर

 


अकोला : स्थानिक डवले कॉलेजच्या विद्यार्थांनी दैदिप्यमान यशाचे प्रदर्शन करीत बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालात जबरदस्त आघाडी घेतली आहे. १२ वी विज्ञान शाखेच्या साई संतोष इंगळे या विद्यार्थ्यांने ९२.८३% (५५७) गुण प्राप्त करुन डवले कॉलेजचे नाव रोशन केले आहे.

हा विद्यार्थी अकोल्यात प्रथम आला आहे. मुलींमधून रिया खारोडे ९१.५०% (५४९), तसेच वाणिज्य शाखेत समृध्दी देशपांडे ९०.८३% (५४५) विज्ञान शाखेत कु. रिया कस्तुरे ९०.५०% (५४३), कु. अंजली जोगी ९०.१७% (५४१), क्रिदय बाछुका ९०.००% (५४०) कु. वैष्णवी हुरबडे ८९.६७% (५३८), किशन टावरी ८९.३३% (५३६), कु. श्रुती कोलते ८८.५०% (५३१), चंदन नरडे ८८.५०% (५३१), शाहानवाज मेमन ८७.३३% ( ५२४), कु. श्रेया अग्रवाल ८७.१७% (५२३), मंदार बाहेकर ८७.००% ( ५२२), श्रीपाद पटोकार ८६.८३% (५२१), क्रिश ताकवाल ८६.६७% (५२०) कु. जानव्ही साठवणे ८६.३३% (५१८), दिप | अग्रवाल ८६.१७% (५१७), कु. खुशी बजाज ८५.६७% (५१४) कु. आर्या पांडे ८५.५०% (५१३), मान्यत झंवर ८५.५०% (५१३), पार्थ ठाकरे ८५.१७% (५११) अमिश पाठक ८५.००% (५१० ), झीयाउल्लाह खान ८५.००% (५१० ), अद्वेत पाठक ८४.८३% (५०९) कु. माही गडपायले ८४.८३% (५०९), वेदांत नरेंद्र लखाडे ८४.६७% (५०८), चेतक चौधरी ८४.५०% (५०७ ) कु. श्रेया फोगला ८४.५०% (५०७), वेदांत माहोरे ८४.३३% (५०६), कु. पलक चांडक ८४.००% (५०४), कु. आर्या जैन ८३.६७% (५०२), कु. ज्ञानेश्वरी मारशेटवार ८३.५७% (५०१) ऋग्वेद राजेंद्र लखाडे ८२.५०% (५०१), अथर्व जसानी ८३.५०% (५०१), धैर्य सारडा ८०.३३% (५००), पद्मकांत बोंथा ८३.३३% (५००)


 सर्व विद्यार्थांचे अभिनंदन 


प्राचार्य प्रकाश डवले, सचिव, सौ. मृणाली डवले, संचालक डॉ. अभिजित डवले उपप्राचार्य सौ. वैशाली निवाने, प्रा. कविता बलींगे, प्रा. प्राची घिनमिने, प्रा. श्वेता फाटे, प्रा. वररुची खेडकर, प्रा. श्रध्दा देशपांडे, प्रा. स्वाती बोरोडे, प्रा. रजनी पांडे, प्रा. इथिका दुबे, प्रा. दिपाली चिकटे, प्रा. परिजात खराबे, सागर लोखंडे, श्याम सुलताने, किशोर स्वर्गे यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या