मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

  डाबकी रोड रुंदीकरणाचे काम योग्य रीतीने करा अन्यथा शिवसेना स्टाईलने... गेल्या 18 महिन्यापासून डाबकी रोड रुंदीकरणाचे काम कसे सुरू आहे हे आपल्या अधिकाऱ्यांनी कधी पहिले आहे का असा रोखठोक प्रश्न शिवसेना नेते डॉक्टर अशोक ओळंबे यांनी मनपा आयुक्त सुनील लहाने यांना विचारला आहे. कारण डाबकी रोड रुंदीकरणाचे काम 18 महिन्यांपासून अर्धवट असून ज्या ठिकाणी होत आहे त्याचे दोन्ही बाजूला रस्ता 3 मीटर, पाणी पुरवठा लाईन, नंतर इलेक्ट्रिक केबल आणि नाली असे काम होत आहे. त्यांनतर पाईप लाईन वर पेव्हर बसविण्याचे काम सुरु आहे. आणि त्याचे खाली सुध्दा काँकरीट टाकून वरून पेंव्हर टाकण्याचा अजब प्रकार सुरू आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग ची मूळ जबाबदारी मनपाची आहे. मात्र स्वतः योग्य रीतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग न करता नागरीकांना ब्रह्मज्ञान सांगणे  कितपत योग्य आहे. आपण पेव्हर खाली काँकरीट बसविण्याचे काम थांबविण्याचे आदेश संबंधित अधिकारी, ठेकेदार यांना त्वरित द्यावे. अन्यथा शिवसेना स्टाईलने पुढील पाऊल उचलू, असा रोखठोक इशारा डॉक्टर अशोक ओळंबे यांनी दिला आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून सैन्याच्या पराक्रमाचा जल्लोष

 

 


अकोला : पहलगाम येथे भारतीयांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात स्थानिक गांधी चौकात लाडू वाटप करून सैन्याच्या पराक्रमाचा जल्लोष करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हा प्रमुख मंगेश काळे, उपजिल्हा प्रमुख तरुण बगेरे, मुकेश मुरूमकार, व उपशहर प्रमुख शरद तुरकर, संजय अग्रवाल याच्या प्रमुख उपस्थितीत फटाके फोडण्यात आले. या वेळी राजेश मिश्रा ,मंगेश काळे,तरुण बगेरे,मुकेश मुरूमकार,शरद तुरकर,अनिल परचुरे,प्रमोद धर्माडे, रुपेश ढोरे,संजय अग्रवाल, देवा गावंडे, राजेश इंगळे,राजेश कानपूरे,राधे शर्मा ,मुन्ना भाऊ उकर्डे, धीरज मिश्रा रोशन राज,रुद्राक्ष राठोड,दशरथ मिश्रा,संजू अण्णा फुललेलु,पंकज श्रीवास,श्याम सारडा, नंदकिशोर ठाकूर,गणेश बुंदेले,अशोक बंदिवान,आकाश ठाकूर,अर्जुन क्षीरसागर,बबलू बियाणी, सुनील वागणारे,अभिषेक मिश्रा,अजय भटकर ,अमर भगत,गोविद जवादे,पवन शाईवले,पंकज भांबळे,लोकेश दुबे,संदीप मालोकार,शंकर शाह,शिवसेनीक व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते असे मीडिया प्रमुख चेतन मारवाल व प्रसिद्धी प्रमुख योगेश गीते यांनी कळविले आहे.

टिप्पण्या