मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

  डाबकी रोड रुंदीकरणाचे काम योग्य रीतीने करा अन्यथा शिवसेना स्टाईलने... गेल्या 18 महिन्यापासून डाबकी रोड रुंदीकरणाचे काम कसे सुरू आहे हे आपल्या अधिकाऱ्यांनी कधी पहिले आहे का असा रोखठोक प्रश्न शिवसेना नेते डॉक्टर अशोक ओळंबे यांनी मनपा आयुक्त सुनील लहाने यांना विचारला आहे. कारण डाबकी रोड रुंदीकरणाचे काम 18 महिन्यांपासून अर्धवट असून ज्या ठिकाणी होत आहे त्याचे दोन्ही बाजूला रस्ता 3 मीटर, पाणी पुरवठा लाईन, नंतर इलेक्ट्रिक केबल आणि नाली असे काम होत आहे. त्यांनतर पाईप लाईन वर पेव्हर बसविण्याचे काम सुरु आहे. आणि त्याचे खाली सुध्दा काँकरीट टाकून वरून पेंव्हर टाकण्याचा अजब प्रकार सुरू आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग ची मूळ जबाबदारी मनपाची आहे. मात्र स्वतः योग्य रीतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग न करता नागरीकांना ब्रह्मज्ञान सांगणे  कितपत योग्य आहे. आपण पेव्हर खाली काँकरीट बसविण्याचे काम थांबविण्याचे आदेश संबंधित अधिकारी, ठेकेदार यांना त्वरित द्यावे. अन्यथा शिवसेना स्टाईलने पुढील पाऊल उचलू, असा रोखठोक इशारा डॉक्टर अशोक ओळंबे यांनी दिला आहे.

नितीन गडकरी यांचा वाढदिवस प्रेरणादायी खासदार अनुप धोत्रे यांचे प्रतिपादन

 



अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकास पुरुष नितीन गडकरी यांनी 70 वर्षाचा बॅकलॉग अकरा वर्षात भरून काढला. संपूर्ण भारतात रस्त्यांचे जाळे विणले.  नितीन गडकरी यांच्याप्रमाणे काम करण्याचा  प्रयत्न करेल असे प्रतिपादन खासदार अनुप धोत्रे यांनी केले. नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त अकोला येथील कार्यक्रमात खासदार अनुप धोत्रे बोलत होते.

संत गजानन महाराज यांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या शताब्दी पूर्व मोठ्या राम मंदिरात भाजपा महानगर तर्फे नितीन गडकरी यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करण्यात आली. 

मंगळवारी शनि जयंती निमित्त राष्ट्रीय नेते व केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष पूजा करण्यात आली. वेदपाठी ब्राह्मण हेमंत शर्मा, घनश्याम शर्मा, चंद्रशेखर खडसे, राजू मेहरे, गोपाल राजवेद, संतोष शुक्ला, जनक जोशी, दिलीप छागाणी यांनी पौरोहित्य केले.

याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार वसंत खंडेलवाल, महानगर अध्यक्ष जयंत मसने, मा.अध्यक्ष विजय अग्रवाल, किशोर मांगटे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजन करण्यात आले. 

               या कार्यक्रमाला विजय अग्रवाल, किशोर पाटील, जयंत मसने,  माधव मानकर, संजय गोटफोडे, गिरीश जोशी,रमेश अलकरी सिद्धार्थ शर्मा, पवन महल्ले दिलीप नायसे,  नितेश पाली,  संतोष डोंगरे, संतोष पांडे, चंदा शर्मा, सुमनताई गावंडे, वैशाली शेळके, श्याम शर्मा, मनीषा भंसाली,माधुरी क्षीरसागर, जान्हवी डोंगरे, साधना येवले, चंदा ठाकूर, निशा कढी, नीता बागडे, सुनील बाठे, प्रकाश घोगलिया संजय झाडोकार, मनोज साहू, विक्की ठाकूर, गणेश सपकाळ, हर्ष चौधरी एडवोकेट देवाशिष काकड, तसेच महानगर पदाधिकारी,  मंडळ पदाधिकारी,  उपस्थित होते.

टिप्पण्या