मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

  डाबकी रोड रुंदीकरणाचे काम योग्य रीतीने करा अन्यथा शिवसेना स्टाईलने... गेल्या 18 महिन्यापासून डाबकी रोड रुंदीकरणाचे काम कसे सुरू आहे हे आपल्या अधिकाऱ्यांनी कधी पहिले आहे का असा रोखठोक प्रश्न शिवसेना नेते डॉक्टर अशोक ओळंबे यांनी मनपा आयुक्त सुनील लहाने यांना विचारला आहे. कारण डाबकी रोड रुंदीकरणाचे काम 18 महिन्यांपासून अर्धवट असून ज्या ठिकाणी होत आहे त्याचे दोन्ही बाजूला रस्ता 3 मीटर, पाणी पुरवठा लाईन, नंतर इलेक्ट्रिक केबल आणि नाली असे काम होत आहे. त्यांनतर पाईप लाईन वर पेव्हर बसविण्याचे काम सुरु आहे. आणि त्याचे खाली सुध्दा काँकरीट टाकून वरून पेंव्हर टाकण्याचा अजब प्रकार सुरू आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग ची मूळ जबाबदारी मनपाची आहे. मात्र स्वतः योग्य रीतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग न करता नागरीकांना ब्रह्मज्ञान सांगणे  कितपत योग्य आहे. आपण पेव्हर खाली काँकरीट बसविण्याचे काम थांबविण्याचे आदेश संबंधित अधिकारी, ठेकेदार यांना त्वरित द्यावे. अन्यथा शिवसेना स्टाईलने पुढील पाऊल उचलू, असा रोखठोक इशारा डॉक्टर अशोक ओळंबे यांनी दिला आहे.

निमा NIMA संघटनेतर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

https://tumchyasathich.blogspot.com/2025/03/vande-bharat-train.html 



अकोला : शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या 94 व्या शहीद दिनानिमित्त इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर गीता नगर अकोला येथे निमा NIMA संघटनेतर्फे 21 ते 23 मार्च दरम्यान रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


याप्रसंगी शहीदांना अभिवादन करून रक्तदान raktdan शिबिराची सुरुवात करण्यात आली. यावेळी पियुष मनोहर घुगे या वीस वर्षीय युवकाने प्रथम रक्तदान केले. यावेळी निमा संघटनेचे केन्द्रीय अध्यक्ष डॉ आशुतोष कुळकर्णी, प्रकल्प प्रमुख डॉ मनोहर घुगे, निमा अध्यक्ष अनिल तोष्नीवाल, डॉ आनंद चतुर्वेदी, डॉ अशोक ओळंबे, डॉ दिनेश राठी, मा. नगरसेवक गजानन गवई, नर्सिंग कॉलेजच्या माहोरे, हाडोळे,  आशिष सावळे, आदेश अंधारे, सचिन बोरेकर यांचे सह हेडगेवार रक्त पेढीचे डॉ पांडे व कर्मचारी तसेच कॉलेजच्या कर्मचारी वर्गाची उपस्थिती होती. बहुसंख्य युवकांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदविला. त्याचप्रमाणे दि २१ मार्च २०२५ रोजी कान्हेरी येथे तसेच भिकमचंद-खंडेलवाल महाविद्यालय येथे रक्तदान शिबीर संपन्न झाले. दि २३ मार्च २०२५ रोजी रा तो आयुर्वेद महाविद्यालय अकोला येथे सुद्धा रक्तदान शिबिर आयोजित केले असे निमा NIMA संघटनेचे उपाध्यक्ष डॉ मनोहर घुगे यांनी कळवीले आहे..

टिप्पण्या