रुग्णांची प्रकृती ठणठणीत करणारे कोण आहेत नॅचरोपॅथिस्ट किरण सदांशिव ?

VISHAL PURANDARE
By -
2 minute read
0

 


अकोला : आज घरोघरी शुगर, मुळव्याध, सोरायसिस, ब्लड प्रेशर, संधिवात दम्याचे पेशंट आढळून येतात. डॉक्टर कडे लाखो रुपये खर्चूनही अनेकांना पाहिजे तसा गुण येत नाही. अशा शेकडो रुग्णांना रियांश (Riyansh) आयुर्वेदिक कंपनीच्या अमृत ज्यूस (Amrit juice) औषधाने ठणठणीत केले आहे. अमृत ज्यूस मुळे एकीकडे रुग्णांची प्रकृती उत्तम होत असताना किरण सदांशिव यांची सुद्धा आर्थिक भरभराट झाली. सहा महिन्यापूर्वी काम सुरू केले तेव्हा 450 रुपये पहिले उत्पन्न त्यांना मिळाले. आता महिन्याकाठी जवळपास लाख रुपये उत्पन्न घेणारे किरण सदांशिव अचानक चर्चेत आले आहेत.




ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्यांनी कम्प्युटर हार्डवेअर सॉफ्टवेअर डिप्लोमा, नॅचरोपॅथीचा डिप्लोमा केला. त्यानंतर अकोला शहरातील वाशिम बायपास परिसरात कम्प्युटर क्लास सुरू केला. त्याचवेळी पार्ट टाइम एका कंपनीत संगणक परिचालक म्हणून काम केले. त्यानंतर जवळपास 15 वर्ष मार्केटिंग जॉब केला. खाजगी नोकरीतून फार काही साध्य होत नाही हे त्यांच्या लक्षात आले. म्हणून स्वतंत्र व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. 


कार सर्विसिंग सेंटर सुरू केले, यातूनच जुन्या कार खरेदी विक्रीचा देखील प्रयत्न केला. नव्याने कम्प्युटर क्लास, पर्सनल डेव्हलपमेंट क्लासेस सुरू केले, कशातच मन लागत नव्हते, कारण आकाशात झेप घ्यायची होती. मात्र संधी मिळत नव्हती... ती अचानक एक दिवस घरी चालत आली.


रवींद्र राठोड व विठ्ठल मगर हे दोन्ही जुने मित्र घरी आले. गप्पा रंगात आल्यावर त्यांनी रियांश अमृत ज्यूस विषयी माहिती दिली. शेकडो रोगांवर एकच गुणकारी औषध असल्याचे सांगितले. माहिती ऐकल्यावर त्यांनी स्वतः एक महिना अमृत ज्यूस सेवन केले. त्यानंतर अनेक रुग्णांना दिले. हळूहळू दमा, सोरायसिस पॅरॅलिसिस, शुगर, बीपी, किडनी स्टोन अनेक लहान मोठ्या आजाराचे रुग्ण बरे होऊ लागले. परत औषधाची डिमांड वाढली. रियांश कंपनी मध्ये नेटवर्क मार्केटिंग करण्याची सुद्धा संधी उपलब्ध आहे. मग इतरही बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा यासाठी ते घरोघरी जाऊन मीटिंग घेऊ लागले. अमृत ज्यूस ची माहिती घरोघरी पोहोचली. एका मागे एक लोक जुळत गेले. आज त्यांनी अकोला शहरात व परिसरात जवळपास 250 तरुणांची साखळी तयार केली आहे. सहा महिन्यांपूर्वी 450 रुपये उत्पन्न मिळविणारे किरण सदांशिव आज महिन्याला लाख रुपये कमवीत आहेत. येत्या एका वर्षात डायमंड होण्याचे त्यांचे ध्येय आहे. त्यांनी आपल्या यशा चे श्रेय रियांश कंपनीचे सीएमडी मधुकर जाधव, (Madhukar jadhav) प्रकाश तामसेकर, (prakash tamsekar) विठ्ठल मगर, (vithhal magar) रवींद्र राठोड (ravindra Rathod) यांना दिले आहे.  

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)