मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

 --- बोरगाव मंजू येथील ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आमदार रणधीर सावरकर यांची पाहणी अकोला, दि. 05 ऑगस्ट 2026 : अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू येथे ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. या कामाची पाहणी मा. आमदार श्री. रणधीरभाऊ सावरकर यांनी परिसरातील नागरिकांसोबत जाऊन केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या प्रसंगी पंकज वाडीवाले, राजू गमे, सुबोध गवई, बंटी मांगे, भटकर, देशमुख, जयकुमार ठोकळ, प्रवीण हगवणे, महेंद्र काळे, ढंगारे , गिरी, रवी काटे तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार सावरकर म्हणाले   "अकोला तालुक्यातील बोरगाव मंजूला पंचक्रोशीत महत्त्वाचे स्थान आहे. या भागातील नागरिक आरोग्य सुविधांपासून वंचित राहू नयेत यासाठी विशेष निधी उपलब्ध करून मी या ग्रामीण रुग्णालयाचे काम सुरू केले होते. आज ते काम अंतिम टप्प्यात आले आहे. पंचक्रोशीतील जनतेला चांगल्या दर्जाची आरोग्य सुविधा मिळावी हाच उद्देश आहे." "एक सुरेख आणि दर्जेदार रुग्णालय या भागातील नागरिकांना मिळावे यासाठी मी अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर...

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे फसवणूक प्रकरण विधानसभेत पोहोचले

  



अकोला : महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची नाफेडच्या खरेदी योजनेत फसवणूक झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. अंदुरा अग्रो प्रोडूसर कंपनी लिमिटेड, अंदुरा यांनी नाफेडच्या माध्यमातून सोयाबीन खरेदी केली. मात्र, या प्रक्रियेत ७० शेतकऱ्यांची ६४ लाख रुपयांची थकबाकी झाली असून, त्यांना उत्पादनाचे पैसे मिळालेले नाहीत. आता हे प्रकरण थेट विधानसभेत पोहोचले आहे.


या प्रकरणात शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी विधानसभेत आवाज उठवला. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षांनी मांडलेल्या कलम २९२ च्या प्रस्तावावर भाष्य करताना त्यांनी या फसवणुकीचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी नाफेडचे व्यवस्थापक ढेकणे यांच्यावरही शासनाने कारवाई करावी, अशी मागणी केली.


शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक ही गंभीर बाब असून, त्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे. शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा असून, त्यांच्या कष्टाची लूट होऊ नये, यासाठी सरकारने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी या प्रकरणाच्या निमित्ताने आमदार रणधीर सावरकर यांनी केली.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट