मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

  डाबकी रोड रुंदीकरणाचे काम योग्य रीतीने करा अन्यथा शिवसेना स्टाईलने... गेल्या 18 महिन्यापासून डाबकी रोड रुंदीकरणाचे काम कसे सुरू आहे हे आपल्या अधिकाऱ्यांनी कधी पहिले आहे का असा रोखठोक प्रश्न शिवसेना नेते डॉक्टर अशोक ओळंबे यांनी मनपा आयुक्त सुनील लहाने यांना विचारला आहे. कारण डाबकी रोड रुंदीकरणाचे काम 18 महिन्यांपासून अर्धवट असून ज्या ठिकाणी होत आहे त्याचे दोन्ही बाजूला रस्ता 3 मीटर, पाणी पुरवठा लाईन, नंतर इलेक्ट्रिक केबल आणि नाली असे काम होत आहे. त्यांनतर पाईप लाईन वर पेव्हर बसविण्याचे काम सुरु आहे. आणि त्याचे खाली सुध्दा काँकरीट टाकून वरून पेंव्हर टाकण्याचा अजब प्रकार सुरू आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग ची मूळ जबाबदारी मनपाची आहे. मात्र स्वतः योग्य रीतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग न करता नागरीकांना ब्रह्मज्ञान सांगणे  कितपत योग्य आहे. आपण पेव्हर खाली काँकरीट बसविण्याचे काम थांबविण्याचे आदेश संबंधित अधिकारी, ठेकेदार यांना त्वरित द्यावे. अन्यथा शिवसेना स्टाईलने पुढील पाऊल उचलू, असा रोखठोक इशारा डॉक्टर अशोक ओळंबे यांनी दिला आहे.

अकोला एलसीबीची मोठी कारवाई !

 




अमली पदार्थ प्रकरणातील आठवा आरोपी जेरबंद


एलसीबी प्रमुख शंकर शेळके यांची कारवाई


अकोला : स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख श्री शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनात बार्शीटाकळी पोलीस ठाणे हद्दीतील अमली पदार्थ प्रकरणातील आठव्या आरोपीस जेरबंद करण्यात आले आहे. आरोपी शेगाव येथे असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर शंकर शेळके यांच्या आदेशाने ही धडक कारवाई करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखा अकोला पोलिसांनी २४ डिसेंबर २०२४ रोजी पो.स्टे. बार्शिटाकळी हद्दीत NDPS अॅक्ट अन्वये कारवाई केली होती. यातील मुख्य आरोपी नामे आदिल मोहम्मद शमीम अन्सार वय ३६ वर्ष रा. वसई मुबई अधिक ०३ आरोपींजवळुन एक कोटी 38 लाख 70 हजार रुपयांचे पाच किलो 548 ग्रॅम वजनाचे अमली पदार्थासह एकूण 2 कोटी 38 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. याप्रकरणी पोलीस स्टेशन बार्शीटाकळी येथे अप क्र. ५३२/२०२४ कलम २२ (सी), ८ (सी), २५, २९ NDPS अॅक्ट अन्वये दाखल करण्यात आला होता. व पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील अधिकारी करित असुन घटनास्थळावरून 5 आरोपींना अटक करण्यात आली होती. ते पाचही आरोपी अदयाप पावेतो न्यायालयीन कोठडीत अकोला कारागृहात आहेत.

सदर गुन्हयातील जप्त अंमलीपदार्थ रासायनिक विश्लेषणासाठी मा. न्याय वैज्ञानिक प्रयोग शाळा अमरावती येथे दाखल केला असता तो अंमलीपदार्थ हे मेफेड्रॉन ड्रग (MD) असल्याचे अहवालात नमुद करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा अकोला चे पोलीस निरिक्षक श्री. शंकर शेळके यांना नमुद गुन्हयातील फरार आरोपी नामे इमरान खान असलम खान वय ४२ वर्ष, रा. सुरत हा शेगाव येथे येत असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या विशेष पथकाने आरोपीस शेगाव येथुन अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह, अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे यांचे मार्गदर्शना खाली पो.नि.शंकर शेळके, स.पो.नि. विजय चव्हाण, पोउपनि गोपाल जाधव, पो.उप.नि. माजीद पठाण स्थानिक गुन्हे शाखा, अकोला तसेच स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पोलीस अमंलदार सुलतान पठाण, खुशाल नेमाडे, वसिमोद्दीन, प्रविण कश्यप, स्वप्निल खेडकर, धिरज वानखडे, स्वप्निल चौधरी, मोहम्मद आमीर यांनी पार पाडली.



टिप्पण्या