मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

  डाबकी रोड रुंदीकरणाचे काम योग्य रीतीने करा अन्यथा शिवसेना स्टाईलने... गेल्या 18 महिन्यापासून डाबकी रोड रुंदीकरणाचे काम कसे सुरू आहे हे आपल्या अधिकाऱ्यांनी कधी पहिले आहे का असा रोखठोक प्रश्न शिवसेना नेते डॉक्टर अशोक ओळंबे यांनी मनपा आयुक्त सुनील लहाने यांना विचारला आहे. कारण डाबकी रोड रुंदीकरणाचे काम 18 महिन्यांपासून अर्धवट असून ज्या ठिकाणी होत आहे त्याचे दोन्ही बाजूला रस्ता 3 मीटर, पाणी पुरवठा लाईन, नंतर इलेक्ट्रिक केबल आणि नाली असे काम होत आहे. त्यांनतर पाईप लाईन वर पेव्हर बसविण्याचे काम सुरु आहे. आणि त्याचे खाली सुध्दा काँकरीट टाकून वरून पेंव्हर टाकण्याचा अजब प्रकार सुरू आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग ची मूळ जबाबदारी मनपाची आहे. मात्र स्वतः योग्य रीतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग न करता नागरीकांना ब्रह्मज्ञान सांगणे  कितपत योग्य आहे. आपण पेव्हर खाली काँकरीट बसविण्याचे काम थांबविण्याचे आदेश संबंधित अधिकारी, ठेकेदार यांना त्वरित द्यावे. अन्यथा शिवसेना स्टाईलने पुढील पाऊल उचलू, असा रोखठोक इशारा डॉक्टर अशोक ओळंबे यांनी दिला आहे.

श्रुती बढे ने पटकावले सुवर्णपदक

 

राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेत'शिवाजी'च्या श्रुतीचा थरार 




अकोला : रायफल शूटिंग स्पर्धा म्हटले की डोळ्यापुढे, शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या श्रुती बढे चे नाव समोर येते. शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाने विविध क्रीडा प्रकारात असे अनेक विद्यार्थी घडविले आहेत. नुकत्याच भोपाळ येथे झालेल्या 68 व्या राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावित श्रुतीने शिवाजी महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.



या स्पर्धेत श्रुती गणेश बढे हिने महाराष्ट्र संघाकडून सहभाग नोंदवला. 19 वर्षांखालील गटात श्रृती गणेश बढे हिने उत्कृष्ट प्रदर्शन करत 353 गुणासह सुवर्णपदक मिळविले. एवढेच नव्हे तर या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने चॅम्पियनशिप जिंकली. 




त्याबददल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्री रामेश्वर भिसे , श्री विलासराव हरणे(संचालक , श्री छत्रपती कॉन्व्हेंट अकोला), श्री राजेश गीते (प्रबंधक), प्रा. सुशीला मळसणे (कनिष्ठ विभाग प्रमुख)प्रा. गोविंद काळे (विज्ञान विभाग प्रमुख)श्री संजय काळे (क्रीडा विभाग प्रमुख), श्री नितीन वाघमारे (क्रीडाशिक्षक) श्री विन्सेंट आमेर (रायफल शूटिंग प्रशिक्षक ) तसेच महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या