मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

  डाबकी रोड रुंदीकरणाचे काम योग्य रीतीने करा अन्यथा शिवसेना स्टाईलने... गेल्या 18 महिन्यापासून डाबकी रोड रुंदीकरणाचे काम कसे सुरू आहे हे आपल्या अधिकाऱ्यांनी कधी पहिले आहे का असा रोखठोक प्रश्न शिवसेना नेते डॉक्टर अशोक ओळंबे यांनी मनपा आयुक्त सुनील लहाने यांना विचारला आहे. कारण डाबकी रोड रुंदीकरणाचे काम 18 महिन्यांपासून अर्धवट असून ज्या ठिकाणी होत आहे त्याचे दोन्ही बाजूला रस्ता 3 मीटर, पाणी पुरवठा लाईन, नंतर इलेक्ट्रिक केबल आणि नाली असे काम होत आहे. त्यांनतर पाईप लाईन वर पेव्हर बसविण्याचे काम सुरु आहे. आणि त्याचे खाली सुध्दा काँकरीट टाकून वरून पेंव्हर टाकण्याचा अजब प्रकार सुरू आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग ची मूळ जबाबदारी मनपाची आहे. मात्र स्वतः योग्य रीतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग न करता नागरीकांना ब्रह्मज्ञान सांगणे  कितपत योग्य आहे. आपण पेव्हर खाली काँकरीट बसविण्याचे काम थांबविण्याचे आदेश संबंधित अधिकारी, ठेकेदार यांना त्वरित द्यावे. अन्यथा शिवसेना स्टाईलने पुढील पाऊल उचलू, असा रोखठोक इशारा डॉक्टर अशोक ओळंबे यांनी दिला आहे.

श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय बाॅक्सिंग स्पर्धेसाठी निवड

 



अकोला : येथील श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये अभूतपूर्व यश संपादन केले आहे. यात आणखी आनंदाची बाब म्हणजे, प्राचार्य डॉक्टर रामेश्वर भिसे यांच्या मार्गदर्शनात या कनिष्ठ महाविद्यालयातील क्रीडापटूंची राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.


स्व. वसंत देसाई स्टेडियम अकोला येथे दिनांक 25 व 26 नोव्हेंबर 2024 दरम्यान शालेय राज्यस्तर बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय अकोला च्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला. 




राज्यस्तर शालेय बॉक्सिंग स्पर्धेत 17 वर्षांखालील गटात महाविद्यालयाची खेळाडू कु. श्रद्धा मंगेश खोब्रागडे हिने उत्कृष्ट प्रदर्शन करीत कांस्यपदक मिळविले तर 19 वर्षाखालील गटात कु. पलक अजय झांबरे हिने सुवर्ण पदक प्राप्त केले. देवांग दुधाराम महागणकर याने कांस्यपदक तर जय सुनील उचाटे याने रौप्य पदक प्राप्त केले या स्पर्धेत महाविद्यालयाच्या खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करीत चार पदक मिळविले. कु पलक अजय झांबरे हिची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेकरीता निवड झाली.




या सर्व खेळाडूंचे महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे , श्री सतीशचंद्र भट (जिल्हा क्रीडा अधिकारी) ,श्री राजेश गीते (प्रबंधक), प्रा. सुशीला मळसणे (कनिष्ठ विभाग प्रमुख) ,श्री संजय काळे (क्रीडा विभाग प्रमुख), श्री नितीन वाघमारे (क्रीडाशिक्षक) श्री गजानन कबीर, श्री आदित्य माने (बॉक्सिंग प्रशिक्षक ) तसेच महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या