मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

  डाबकी रोड रुंदीकरणाचे काम योग्य रीतीने करा अन्यथा शिवसेना स्टाईलने... गेल्या 18 महिन्यापासून डाबकी रोड रुंदीकरणाचे काम कसे सुरू आहे हे आपल्या अधिकाऱ्यांनी कधी पहिले आहे का असा रोखठोक प्रश्न शिवसेना नेते डॉक्टर अशोक ओळंबे यांनी मनपा आयुक्त सुनील लहाने यांना विचारला आहे. कारण डाबकी रोड रुंदीकरणाचे काम 18 महिन्यांपासून अर्धवट असून ज्या ठिकाणी होत आहे त्याचे दोन्ही बाजूला रस्ता 3 मीटर, पाणी पुरवठा लाईन, नंतर इलेक्ट्रिक केबल आणि नाली असे काम होत आहे. त्यांनतर पाईप लाईन वर पेव्हर बसविण्याचे काम सुरु आहे. आणि त्याचे खाली सुध्दा काँकरीट टाकून वरून पेंव्हर टाकण्याचा अजब प्रकार सुरू आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग ची मूळ जबाबदारी मनपाची आहे. मात्र स्वतः योग्य रीतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग न करता नागरीकांना ब्रह्मज्ञान सांगणे  कितपत योग्य आहे. आपण पेव्हर खाली काँकरीट बसविण्याचे काम थांबविण्याचे आदेश संबंधित अधिकारी, ठेकेदार यांना त्वरित द्यावे. अन्यथा शिवसेना स्टाईलने पुढील पाऊल उचलू, असा रोखठोक इशारा डॉक्टर अशोक ओळंबे यांनी दिला आहे.

विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देणारा 'शिवाजी अभियांत्रिकी' चा स्वच्छता ही सेवा पंधरवाडा




अकोला : श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती संचलित अकोला येथील अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयातील  स्वच्छता ही सेवा पंधरवाडा विविध स्पर्धांनी चर्चेतआला आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून  स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याच अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा करण्यात आला. 


महाविद्यालय परिसरातील 

टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंची निर्मिती


स्वच्छता करणे,त्याचबरोबर विविध स्पर्धांचे आयोजन  त्यामध्ये पोस्टर प्रदर्शनी, निबंध लेखन स्पर्धा आणि टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करने इत्यादींचा समावेश आहे. या पंधरवड्याची सांगता म्हणून 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधीजी यांच्या जयंती प्रित्यर्थ या पंधरवड्याचा समारोप करण्यात आला. 




विजेत्या स्पर्धकांचे कौतुक


या स्पर्धेमध्ये  प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. या समारंभाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे श्री महादेवरावजी भुईवार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. व्ही. थोरात यांच्या हस्ते या स्पर्धांचे  उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. धर्मेंद्र कोठारी तसेच महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. ज्योती शेगोकार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला, कार्यक्रमाचे संचालन सह कार्यक्रम अधिकारी डॉ. व्ही. आर. ठाकरे यांनी केले. डॉ. ज्योती शेगोकार यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला परीक्षक म्हणून प्रा.एस. डी. देशमुख व प्रा. कपिल निळे यांची नेमणूक करण्यात आली होती. स्पर्धेमध्ये बक्षिसे पटकावलेल्या तसेच भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे पाहुण्यांतर्फे कौतुक करण्यात आले.



संचालक मंडळाचे मार्गदर्शन


श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. हर्षवर्धनजी देशमुख व कार्यकारिणी अमरावती सदस्य तसेच स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य यांचे मार्गदर्शन लाभले. या समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी बोलताना श्री महादेवरावजी भुईवार यांनी  विद्यार्थ्यांबरोबरच विद्यार्थिनींना प्रोत्साहित करत आपण वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार करावा व जीवनात पुढे जावे असे आपल्या भाषणातून नमूद केले. कार्यक्रमाची सांगता अल्पोपहारने झाली. या सर्व कार्यक्रमासाठी तसेच या पंधरवड्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी आणि स्वयंसेवक साहित्या बमन, जानवी चिंचोळकर, सृष्टी सानप, नंदिता नाकाट, आयुष श्रीवास, प्रथमेश ढोरे, अथर्व जून गाडे, श्रेयस ठाकरे, अथर्व सरोदे, मुरली राठोड, खदीज्या तूल कुब्रा, साहिल कालारकर, आकांक्षा पळसकर, सुजय ग्रामकर, युगंधर भांबेरे  या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

    

टिप्पण्या