मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

सरळ खरेदी पद्धतीने जमीन संपादित केलेल्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा

     मुंबई : जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली 16 जून रोजी मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत सन २००६ ते २०१३ दरम्यान सरळ खरेदीधारक प्रकल्पग्रस्तांना विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने प्रति हेक्टरी पाच लक्ष सानुग्रह अनुदान मंजूर करून एकुण ८३२ कोटी रुपये दिले.  त्या प्रमाणे मृद व जलसंधारण विभागामार्फत सुद्धा सरळ खरेदी पद्धतीने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. अनावधानाने २४ सप्टेंबर दोन हजार २४ रोजी सरळ खरेदी धारक शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्या संदर्भातील परिपत्रक विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरचे वतीने निर्गमित करण्यात आले होते.त्यावेळी मृद व जलसंधारण विभागाने सरळ खरेदी पद्धतीने संपादित केलेल्या जमीनधारक शेतकऱ्यांना वगळले होते.त्यामुळे सदर शेतकऱ्यांमध्ये तिव्र नाराजी झाली होती, अशी माहिती बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी दिली. शासन तथा प्रशासन स्तरावर झालेली चुक नंतर लक्षात आली.या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथील संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मृद व जलसंधारणाचा जि....

असह्य आजारातून केली महिलेची सुटका

https://tumchyasathich.blogspot.com/2024/09/blog-post_57.html 



आमदार नितीन देशमुख व मंगेश केनेकर यांच्या प्रयत्नांना यश

मुंबईच्या प्रख्यात रुग्णालयात केले उपचार


असं म्हणतात ज्याच्या मागे कोणी नाही त्याच्या मागे देव आहे. घरची परिस्थिती जेमतेम, चरितार्थ चालविण्यासाठी दिवस रात्र संघर्ष... अशातच पोटाच्या विकाराची असह्य व्याधी जडली. नागपूर अमरावतीत उपचार करूनही काहीच साध्य झाले नाही. अशा परिस्थितीमध्ये विवरा येथील रुग्णसेवक मंगेश केनेकर यांची भेट झाली. त्यानंतर मुंबईतील प्रख्यात रुग्णालयात या महिलेवर अत्यल्प खर्चात उपचार झाले. आज या महिलेची प्रकृती ठणठणीत आहे

पातुर तालुक्यातील दिग्रस खुर्द येथील अतिशय हालाखीची परिस्थिती असलेल्या किरण बर्डे ही महिला (वय ३० वर्षे) पोटाच्या विकाराने त्रस्त होती. 
  अकोला,अमरावती व नागपूर येथे तज्ञ डाॅक्टरांकडे अनेकदा उपचार घेतले परंतु त्यांना म्हणावा तसा आराम मिळाला नाही. अनेकांनी त्यांना विविध नैसर्गिक आयुर्वेदिक उपचार पद्धती अवलंबवायला सांगितल्या तरीही काही फरक पडला नाही.


  अशात त्यांना विवरा येथील रहिवासी  तसेच रूग्णसेवक संघटनेच्या माध्यमातून अनेक गरीब रूग्णांना जीवदान देणारे रूग्णसेवक मंगेश केनेकर यांची माहिती मिळाली. केनेकर यांनी क्षणाचा विलंब न करता रूग्ण किरण बर्डे यांच्या वैद्यकीय चाचणीचे रिपोर्ट मुंबई येथील हिंदुजा रुग्णालयातील पोट विकार तज्ञ डाॅक्टरांकडे पाठवले.डाॅक्टरांच्या सुचनेनुसार रूग्ण महिलेस ताबडतोब मुंबई येथे त्या रूग्णालयात दाखल केले तेव्हा त्यांना उपचारासाठी जवळपास 13 लाख रुपये खर्च येणार असल्याचे तेथील तज्ञ डाॅक्टरांनी सांगितले.



महाराष्ट्र राज्य संघटना संस्थापक अध्यक्ष प्रवीण भोटकर यांना माहिती दिली.  रूग्णालयाचे कोटेशन घेतले व मुंबई येथील रूग्णांच्या उपचारासाठी आर्थिक मदत देणा-या धर्मादाय संस्था गाठल्या.
  सिद्धीविनायक गणपती,रतन टाटा ट्रस्ट, बिग वुमेन ट्रस्ट कमलाबाई आहुजा ट्रस्ट, गणपती संस्थान ट्रस्ट घाटकोपर, जोसेफ फर्नांडिस ट्रस्ट,विमल आहुजा ट्रस्ट,मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी सह अन्य संस्थांची १३ लाख ७६ हजार रूपयांची मदत मंगेश केनेकर यांनी या महिलेला मिळवून देत तिचे तीन वेगवेगळे ऑपरेशन यशस्वी करून तिला होणा-या असह्य त्रासातून मुक्त केले.
  महिला रूग्ण किरण बर्डे व त्यांच्या परिवाराने त्यांना मदत केलेल्या सर्वांचे मनापासून आभार मानले.आमदार नितीन देशमुख यांनी सुद्धा विशेष सहकार्य व आर्थिक मदत सुद्धा केली.

टिप्पण्या