मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

  डाबकी रोड रुंदीकरणाचे काम योग्य रीतीने करा अन्यथा शिवसेना स्टाईलने... गेल्या 18 महिन्यापासून डाबकी रोड रुंदीकरणाचे काम कसे सुरू आहे हे आपल्या अधिकाऱ्यांनी कधी पहिले आहे का असा रोखठोक प्रश्न शिवसेना नेते डॉक्टर अशोक ओळंबे यांनी मनपा आयुक्त सुनील लहाने यांना विचारला आहे. कारण डाबकी रोड रुंदीकरणाचे काम 18 महिन्यांपासून अर्धवट असून ज्या ठिकाणी होत आहे त्याचे दोन्ही बाजूला रस्ता 3 मीटर, पाणी पुरवठा लाईन, नंतर इलेक्ट्रिक केबल आणि नाली असे काम होत आहे. त्यांनतर पाईप लाईन वर पेव्हर बसविण्याचे काम सुरु आहे. आणि त्याचे खाली सुध्दा काँकरीट टाकून वरून पेंव्हर टाकण्याचा अजब प्रकार सुरू आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग ची मूळ जबाबदारी मनपाची आहे. मात्र स्वतः योग्य रीतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग न करता नागरीकांना ब्रह्मज्ञान सांगणे  कितपत योग्य आहे. आपण पेव्हर खाली काँकरीट बसविण्याचे काम थांबविण्याचे आदेश संबंधित अधिकारी, ठेकेदार यांना त्वरित द्यावे. अन्यथा शिवसेना स्टाईलने पुढील पाऊल उचलू, असा रोखठोक इशारा डॉक्टर अशोक ओळंबे यांनी दिला आहे.

दिवाळी तोंडावर : प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा

 




प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पैसे टाका : मनोज चव्हाण 


अकोला : विदर्भातील सरळ खरेदी धारक शेतकऱ्यांच्या संघर्षाला यश प्राप्त झाले आहे. १६,६३३ हेक्टर सरळ खरेदीने संपादित झालेल्या जमीनीला गेल्या २६ सप्टेंबर रोजी सह्याद्री अतिथी गृह मुंबई येथे संपन्न झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ८३२ कोटी रुपये सानुग्रह अनुदानास मंजूरी दिली आहे. दिवाळी तोंडावर आली तरी बँक खात्यात रक्कम जमा न झाल्याने प्रकल्पग्रस्त शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

सदरची कार्यवाही विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांना करण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांच्या संघर्षातून मंजूर झालेला हक्काचा मोबदला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळी पुर्वी देण्याची मागणी विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या शिष्टमंडळाने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक मा.सोनटक्के यांना केली आहे.आजच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोजभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मोबदला वितरण प्रणाली तसेच संबंधित इतरही बाबींवर चर्चा केली सोनटक्के यांनी सुध्दा सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.त्यामुळे प्रकल्पग्रस्तांची दिवाळी आनंदाची होईल अशी आशा संघटनेला असल्याचे मनोज भाऊ चव्हाण यांनी सांगितले.

यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत मुरादे, सहसचिव भुषण चौधरी, गौतमराव खंडारे,मनोज भाऊ तंबाखे, दिलीपभाऊ कदम राजुभाऊ लोणकर,मनोज जैन,प्रा. निलेश ठाकरे, चंदु भाऊ खांडेकर, उपस्थित होते.

टिप्पण्या