मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

 --- बोरगाव मंजू येथील ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आमदार रणधीर सावरकर यांची पाहणी अकोला, दि. 05 ऑगस्ट 2026 : अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू येथे ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. या कामाची पाहणी मा. आमदार श्री. रणधीरभाऊ सावरकर यांनी परिसरातील नागरिकांसोबत जाऊन केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या प्रसंगी पंकज वाडीवाले, राजू गमे, सुबोध गवई, बंटी मांगे, भटकर, देशमुख, जयकुमार ठोकळ, प्रवीण हगवणे, महेंद्र काळे, ढंगारे , गिरी, रवी काटे तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार सावरकर म्हणाले   "अकोला तालुक्यातील बोरगाव मंजूला पंचक्रोशीत महत्त्वाचे स्थान आहे. या भागातील नागरिक आरोग्य सुविधांपासून वंचित राहू नयेत यासाठी विशेष निधी उपलब्ध करून मी या ग्रामीण रुग्णालयाचे काम सुरू केले होते. आज ते काम अंतिम टप्प्यात आले आहे. पंचक्रोशीतील जनतेला चांगल्या दर्जाची आरोग्य सुविधा मिळावी हाच उद्देश आहे." "एक सुरेख आणि दर्जेदार रुग्णालय या भागातील नागरिकांना मिळावे यासाठी मी अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर...

विजयादशमी विशेष : अकोल्यात होणार 51 फूट रावणाचे दहन

https://194888.click-allow.top/



अकोला : दृष्ट, अनैतिक प्रवृत्तीचे प्रतीक व अन्याय, अत्याचाराच्या विरोधात रावण(ravan) दहन करण्याची प्रथा गेल्या 22 वर्षापासून अकोला शहरात कायम आहे. यंदाही विजया दशमीला(Vijaya dashmi) रावण दहन करण्यात येणार आहे... मात्र 51 फूट उंच रावणाचे दहन... ते सुद्धा रिमोट कंट्रोल द्वारे.




 तापडिया नगर युवाशक्ती नवदुर्गा मंडळ, नगरसेविका गीतांजली शेगोकार, सागर शेगोकार यांच्या पुढाकाराने ही संकल्पना प्रत्यक्षात उतरणार आहे. नवीन पिढीला रामायण कथेचे महत्व माहित व्हावे, प्राचीन संस्कृतीचा प्रचार प्रसार व्हावा, सनातन धर्माची परंपरा कायम राहावी या दृष्टीने यंदाही विजयादशमीच्या दिवशी शनिवार, 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7.00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण ,तापडिया नगर येथे हा सोहळा पार पडणार आहे. 




भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर (randhir) सावरकर ,खा.अनुपभाऊ धोत्रे ,आमदार वसंत खंडेलवाल, विजय अग्रवाल, जयंत मसने, किशोर मागटे पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. याकार्यक्रमासाठी बालक आणि महिलांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.  300 युवकांची चमू कार्यरत आहे. माजी नगरसेवक सागर शेगोकार,अंकुश देशमुख, अमित फोकमारे, निखिल देशमुख, हरीश काळे, धनराज अहिर, सचिन झाडोकार, उल्हास निवाने गणेश तायडे धीरज पटेल भावेश सोळंकी गोपाल सोनवणे प्रतीक जयस्वाल ओम कुचके विठ्ठल कुचके गोटू हिवराळे मनोज ढगे निशांत मानकर नरेंद्र साठे सुमित ठाकूर चंद्रकांत दांदळे आदींकडे विशेष व्यवस्था सोपवण्यात आली आहे. 


आतिशबाजीची व्यवस्था




हा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उमरी तापडिया नगर रामदास पेठ रतनलाल प्लॉट राऊतवाडी जवाहर नगर जवाहर नगर न्यू तापडिया नगर देशमुख फाईल खरप, या भागातील येत असतात नवदुर्गा युवाशक्ती मंडळाने यासाठी विशेष आतिशबाजीची(atishbaji) व्यवस्था केलीआहे.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट