मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

  बावनकुळे मंत्री नाही तो ठेकेदार आहे आमदार नितीन देशमुख यांच्या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक  अकोला, दि. 8 ऑक्टोबर 2026 : बाळापूर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख (उबाठा गट) यांनी महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल बेताल व बदनामीकारक वक्तव्य केल्याचा भाजपचा आरोप आहे. त्यामुळे संतप्त भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना  निवेदन देऊन आमदार नितीन देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. हे निवेदन जिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि पोलीस निरीक्षक, सिव्हील लाईन पोलीस ठाणे, अकोला यांना देण्यात आले आहे. याप्रसंगी माजी आमदार बळीराम सिरस्कार यांच्या नेतृत्वात रमण जैन, किशोर कुचके, नितीन लांडे, गणेश गाडगे, नरेश फुरंगे, चंद्रकांत अंधारे, कपिल खरप, विजय फुकट, अजिंक्य राऊत, राजूभाऊ उगले, अजय ढोणे, मंगेश भरणे, योगेश पटोकार, माधव म्हैसने, विक्की वडतकार, अक्षय भाकरे, कैलास इंगळे उपस्थित होते.  प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार 07 ऑक्टोबर 2026 रोजी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आमदार नितीन देश...

भर उन्हात जनगणना प्रशिक्षण प्रशिक्षणार्थींचे हाल, मनपाचा ढिसाळ कारभार

 



                            विशाल पुरंदरे 


अकोला : शहरातील जनगणना करण्यासाठी शिक्षक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक तसेच शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना सध्या प्रशिक्षण देणे सुरू आहे. प्रचंड तापमान असतानाही सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत उन्हाच्या वेळी प्रशिक्षण ठेवल्याने कर्मचाऱ्यांच्या जीवाची लाही लाही होत आहे.


सध्या अकोला महापालिका दक्षिण झोन अंतर्गत स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये जवळपास 100 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. काही प्रशिक्षणार्थीं ची एसी हॉलमध्ये व्यवस्था असल्याने त्यांना अजिबात त्रास नाही. मात्र इतर प्रशिक्षणार्थींची व्यवस्था वरच्या मजल्यावर करण्यात आली, त्यामुळे प्रशिक्षणार्थींना दिवसभर घामाच्या धारा लागल्या. 


दोन कुलर केवळ नावापुरता ठेवले होते. दोन्ही कुलर आपोआप बंद पडले. एवढेच काय तर ठेवलेल्या खुर्च्या मध्ये शिक्षक बसल्यानंतर जुन्या खुर्च्या तुटून शिक्षक खाली पडले. दुपारी प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केल्यानंतर अखेर एक टेक्निशियन पाठविण्यात आला. त्याने एक कुलर दुरुस्त केला. मात्र दुसरा कुलर सुरू नसल्याने महिला कर्मचाऱ्यांची ससेहोलपट झाली.


 एवढ्या गर्मीत बसणे असह्य झाल्याने कर्मचारी सुट्टी देण्याची विनवणी करू लागले, मात्र ठरलेल्या वेळेआधी सुट्टी देणे शक्य नसल्याचे सांगत तशाच परिस्थितीत कर्मचाऱ्यांना बसवून ठेवले. महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे जनगणना कर्मचाऱ्यांना मानसिक व शारीरिक त्रास होत आहे. याकडे महापौर शारदाताई खेडकर व स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल लक्ष देतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


भोजनाची योग्य व्यवस्था नाही


प्रशिक्षण घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जेवणाची योग्य व्यवस्था करण्यात आलेली नाही. रेल्वेतील पार्सल प्रमाणे शिक्षकांना जेवणाचे पार्सल देण्यात येत आहे. भाजी कमी देण्यात येत असल्याने पोळ्या व भात टाकून देण्याची वेळ येत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

टिप्पण्या