मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

अकोल्यात इंडिया महाविकास आघाडीचे ज्ञानेशकुमार विरोधात जोरदार आंदोलन

अकोला : दिल्लीमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी इंडिया आघाडीच्या 300 खासदारांचे जोरदार आंदोलन सुरू आहे. त्याच धर्तीवर अकोल्यातही इंडिया महाविकास आघाडीच्या वतीने घोषणाबाजी, नारेबाजी करून ज्ञानेश कुमार यांना हटविण्याची मागणी करण्यात आली. स्थानिक शहीद मदनलाल धिंग्रा चौकामध्ये आंदोलन सुरू होण्यापूर्वी इंडिया महाआघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी हातात फलक घेऊन स्वराज्य भवन येथून रॅली काढली. चौकामध्ये आल्यानंतर 'ज्ञानेश कुमार हटाव देश बचाव' अशा घोषणा देऊन ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. यावेळी संविधानाच्या अनुच्छेद 326 चे सामूहिक वाचन करण्यात आले. या अनुच्छेदामध्ये प्रत्येक मतदाराचा अधिकार समाविष्ट असून या अनुच्छेदाला धक्का लावण्याचे काम ज्ञानेश कुमार, नरेंद्र मोदी व अमित शहा करीत असल्याचा आरोप करण्यात आला.  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आ. साजिद खान पठाण, अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रकाश तायडे, महानगराध्यक्ष महेंद्र गवई यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनाला...

खबरदार ! विकासाच्या नावावर जनतेची आर्थिक कोंडी कराल तर... – आ. साजिद खान पठाण यांचा सत्ताधाऱ्यांना इशारा

 



अकोला : मनपात सत्ता स्थापन झाल्यानंतर शहरातील नागरिकांवर कचरा संकलनाच्या नावाखाली दरवर्षी ६०० रुपयांचा कर लादण्याचा निर्णय घेतला गेल्याने अकोलेकरांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. आधीच विविध करांच्या ओझ्याखाली दबलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर हा नवा ‘भुर्दंड’ पडत असल्याने मनपाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


दरम्यान, कचरा कर वसुली सुरू असतानाच शहरातील घंटागाडी सेवा विस्कळीत झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. अनेक भागांत घंटागाड्या वेळेवर न येणे, काही ठिकाणी पूर्णपणे सेवा बंद पडणे, तर काही भागांत कचऱ्याचे ढिग साचणे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला असून नागरिकांच्या आरोग्यावरही धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


या पार्श्वभूमीवर आ. साजिद खान पठाण यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल चढवत या निर्णयावर कडाडून टीका केली आहे. “विकासाच्या नावाखाली जनतेची आर्थिक कोंडी करणे हा कोणत्याही परिस्थितीत योग्य मार्ग नाही. शहराच्या प्रगतीसाठी आम्ही सकारात्मक आहोत; मात्र करांच्या माध्यमातून नागरिकांची पिळवणूक करणे खपवून घेतले जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.


आधीच ‘डर्टी टॅक्स’च्या नावाखाली नागरिक त्रस्त असताना त्यात आणखी ६०० रुपयांचा कचरा कर लादणे म्हणजे सामान्य माणसाच्या सहनशीलतेची परीक्षा घेणारा निर्णय असल्याचे त्यांनी नमूद केले. “सत्ताधाऱ्यांनी विकासाच्या गोंडस नावाखाली आर्थिक भार टाकण्याऐवजी पर्यायी उत्पन्नाचे मार्ग शोधले पाहिजेत,” असा टोला त्यांनी लगावला.


मनपाने शहरातील स्वतःच्या मालकीच्या मोक्याच्या जागांचा योग्य वापर करून महसूल वाढवावा, अशी ठोस भूमिका त्यांनी मांडली. मुख्य बाजारपेठेतील दानाबाजार परिसरात अत्याधुनिक शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारून विद्यमान व्यापाऱ्यांना प्राधान्य देत सवलती द्याव्यात, तसेच इतर प्रमुख ठिकाणीही अशा प्रकल्पांची उभारणी करून मनपाचा आर्थिक पाया मजबूत करावा, अशी मागणी त्यांनी केली.


“शहर विकासाच्या प्रत्येक चांगल्या उपक्रमाला आमचा ठाम पाठिंबा राहील; मात्र जनतेच्या खिशावर डल्ला मारणारे निर्णय आम्ही कदापि सहन करणार नाही,” असा कडक इशारा देत आ. साजिद खान पठाण यांनी सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान दिले.


यावेळी मनपाचे विरोधी पक्षनेते डॉ. झिशान हुसैन, कपिल रावदेव, नगरसेविका प्रिया अश्विन शिरसाट, आर्शिया परवीन मोहम्मद शारिक, निखत परवीन अफसर कुरेशी, निलोफर खान सोहेल खान, आकाश कवडे, गुड्डू पठाण, मोहम्मद शारिक यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या