मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

सरळ खरेदी पद्धतीने जमीन संपादित केलेल्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा

     मुंबई : जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली 16 जून रोजी मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत सन २००६ ते २०१३ दरम्यान सरळ खरेदीधारक प्रकल्पग्रस्तांना विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने प्रति हेक्टरी पाच लक्ष सानुग्रह अनुदान मंजूर करून एकुण ८३२ कोटी रुपये दिले.  त्या प्रमाणे मृद व जलसंधारण विभागामार्फत सुद्धा सरळ खरेदी पद्धतीने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. अनावधानाने २४ सप्टेंबर दोन हजार २४ रोजी सरळ खरेदी धारक शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्या संदर्भातील परिपत्रक विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरचे वतीने निर्गमित करण्यात आले होते.त्यावेळी मृद व जलसंधारण विभागाने सरळ खरेदी पद्धतीने संपादित केलेल्या जमीनधारक शेतकऱ्यांना वगळले होते.त्यामुळे सदर शेतकऱ्यांमध्ये तिव्र नाराजी झाली होती, अशी माहिती बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी दिली. शासन तथा प्रशासन स्तरावर झालेली चुक नंतर लक्षात आली.या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथील संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मृद व जलसंधारणाचा जि....

पश्चिम बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय; आसाम-पाँडिचेरीत हॅट्रिक - अकोल्यात जल्लोष

 



अकोला, 3 मे : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवत इतिहास रचला. तर आसाम व पाँडिचेरीमध्ये लागोपाठ तिसऱ्यांदा सत्ता मिळवत भाजप-एनडीएने हॅट्रिक साधली. महाराष्ट्रातील निवडणुकीतही भाजपला अभूतपूर्व यश मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या या विजयाचा जल्लोष अकोल्यात जयप्रकाश नारायण चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह व भारतीय जनता पार्टी कार्यालयासमोर आतिषबाजी, ढोल-नगारे वाजवून, पेढे वाटप करून साजरा करण्यात आला.  


यावेळी आमदार रणधीर सावरकर, महानगर अध्यक्ष जयंत मसने, विजय अग्रवाल, महापौर शारदाताई खेडकर, उपमहापौर अमोल गोगे, माधव मानकर, अंबादास उमाळे, डॉ. शंकरराव वाकोडे, ॲड. देवाशिष काकड, पवन महल्ले, सिद्धार्थ शर्मा, वसंत बाछुका, वैशाली शेळके, पुरुषोत्तम पानझाडे, दिलीप मिश्रा, चंदा शर्मा, चंदा ठाकूर, किशोर वारोकार, संदीप गावंडे, नितेश पाली, तुषार भिरड, निलेश निनोरे, हेमंत शर्मा, रुपेश ठाकूर, रुपेश यादव, अमोल गीते, रमेश करिहार, मंजुषाताई शेळके, शितल जाईल, प्रशांत जोशी, कन्या आऊजा, संदीप शेगोकार, राजू थोरवे, विनोद मापारी, राम खरात, पल्लवी मोरे, नारायण बोर्डे, उमेश श्रीवास, रोहित चौरसिया, डॉ. अमित कावरे, किशोर कुचके, गणेश लोड, रणजीत खेडकर, मनीष बाछुका, कृष्णा पांडे, संजय झाडोकार, राजेंद्र गिरी, गोपाल मुळे, संजय कोरडे, ॲड. नितीन गवळी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.  


आमदार रणधीर सावरकर म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये भाजपने इतिहास घडवला आहे. तुष्टीकरणाच्या राजकारणाला जनतेने नाकारले. आसाम व पाँडिचेरीत हॅट्रिक करून जनतेने विकास, हिंदुत्व व राष्ट्रवादावर शिक्कामोर्तब केले. महाराष्ट्रातील ऐतिहासिक विजयाने 2027 व 2029 च्या विजयाची नांदी झाली आहे. हा विजय बूथ कार्यकर्त्यांच्या त्यागाचा, संघ परिवाराच्या तपस्येचा व कालीमाता, कामाख्या देवीच्या आशीर्वादाचा आहे. अकोल्यातील प्रत्येक घरात आता कमळ पोहोचेल.

टिप्पण्या