बावनकुळे मंत्री नाही तो ठेकेदार आहे आमदार नितीन देशमुख यांच्या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक अकोला, दि. 8 ऑक्टोबर 2026 : बाळापूर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख (उबाठा गट) यांनी महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल बेताल व बदनामीकारक वक्तव्य केल्याचा भाजपचा आरोप आहे. त्यामुळे संतप्त भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन आमदार नितीन देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. हे निवेदन जिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि पोलीस निरीक्षक, सिव्हील लाईन पोलीस ठाणे, अकोला यांना देण्यात आले आहे. याप्रसंगी माजी आमदार बळीराम सिरस्कार यांच्या नेतृत्वात रमण जैन, किशोर कुचके, नितीन लांडे, गणेश गाडगे, नरेश फुरंगे, चंद्रकांत अंधारे, कपिल खरप, विजय फुकट, अजिंक्य राऊत, राजूभाऊ उगले, अजय ढोणे, मंगेश भरणे, योगेश पटोकार, माधव म्हैसने, विक्की वडतकार, अक्षय भाकरे, कैलास इंगळे उपस्थित होते. प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार 07 ऑक्टोबर 2026 रोजी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आमदार नितीन देश...
वैशिष्ट्यीकृत
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय, अकोला यांची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
अकोला : येथील श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाने आपल्या यशाची परंपरा कायम ठेवली असून महाविद्यालयांमध्ये कला, वाणिज्य व विज्ञान या तीनही शाखेचे एकूण 649 विद्यार्थी बारावी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 547 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. द्विलक्षी अभ्यासक्रमाचा निकाल 55.55% लागला असून विज्ञान शाखेचा निकाल 95.50% लागला आहे.
आयुष संजू गीते 84.50% गुण घेऊन विज्ञान शाखेतून प्रथम आला आहे, गार्गी निर्मलकुमार गजरे 82% गुण घेऊन द्वितीय आणि सायली श्रावण इंगळे 81.67% गुण घेऊन तृतीय आली आहे
कला शाखेचा निकाल 68.60% लागला असून कु. नंदिनी सुभाष तायडे 91% गुण घेऊन प्रथम आली आहे.
कु. श्रुती संतोष अंभोरे 88.83% गुण घेऊन द्वितीय आली आहे.
कु. नेहा नागसेन शिराळे 86% गुण घेऊन तृतीय आली आहे.
वाणिज्य शाखेचा निकाल 76.92% लागला असून कु. नेहा नंदकिशोर जांभेकर 84.50% गुण घेऊन प्रथम आली आहे.
लुबना गझल महम्मद साजिद 83.67% गुण घेऊन द्वितीय आली आहे.
महंमद अबूबकार अब्दुल नजीम 81.67% गुण घेऊन तृतीय आला आहे.
महाविद्यालयातील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख तथा संस्था कार्यकारिणीसह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे, क.म.वि. प्रमुख प्रा. सुशीला मळसने, विज्ञान विभाग प्रमुख प्रा. श्रीकृष्ण तराळे, कला विभाग प्रमुख डॉ. अर्चना पोटे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. अस्मिता बढे, प्रबंधक राजेश गीते व सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकवृंद व इतर शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
लोकप्रिय पोस्ट
शेतकऱ्यांना नऊ कोटी अनुदानाचे वाटप, प्रकल्पग्रस्तांसाठी सुवर्ण दिवस
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
10 मार्चला अमरावतीत प्रकल्पग्रस्तांचा महाएल्गार मोर्चा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स









टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा