मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

  बावनकुळे मंत्री नाही तो ठेकेदार आहे आमदार नितीन देशमुख यांच्या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक  अकोला, दि. 8 ऑक्टोबर 2026 : बाळापूर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख (उबाठा गट) यांनी महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल बेताल व बदनामीकारक वक्तव्य केल्याचा भाजपचा आरोप आहे. त्यामुळे संतप्त भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना  निवेदन देऊन आमदार नितीन देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. हे निवेदन जिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि पोलीस निरीक्षक, सिव्हील लाईन पोलीस ठाणे, अकोला यांना देण्यात आले आहे. याप्रसंगी माजी आमदार बळीराम सिरस्कार यांच्या नेतृत्वात रमण जैन, किशोर कुचके, नितीन लांडे, गणेश गाडगे, नरेश फुरंगे, चंद्रकांत अंधारे, कपिल खरप, विजय फुकट, अजिंक्य राऊत, राजूभाऊ उगले, अजय ढोणे, मंगेश भरणे, योगेश पटोकार, माधव म्हैसने, विक्की वडतकार, अक्षय भाकरे, कैलास इंगळे उपस्थित होते.  प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार 07 ऑक्टोबर 2026 रोजी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आमदार नितीन देश...

महात्मा फुले यांचे विचार प्रेरणादायी आमदार सावरकर यांचे प्रतिपादन

 




अकोला : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी देशातील महिलांना शिक्षितच नव्हे तर सुशिक्षित केले. मातृशक्तीला समानतेची वागणूक मिळावी यासाठी आजीवन वैचारिक लढा दिला. अशा थोर पुरुषाचे द्विशताब्दी वर्ष साजरे करण्याची संधी मला लाभली हे माझ्या जीवनातील सुवर्णक्षण आहेत असे प्रतिपादन अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी केले.


पुढे बोलताना आमदार रणधीर सावरकर म्हणाले की, मातृशक्ती सुरक्षित राहील, संस्कारी राहील, शिक्षित राहील तरच राष्ट्र पुढे जाईल हे महात्मा फुले यांनी ओळखले होते.

 स्त्री शिक्षण व अनिरुष्ट रूढींचा विरोध करून मानवता धर्माचा प्रचार प्रसार त्यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत कार्य पुढे नेण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले असे यावेळी ते म्हणाले.


  महात्मा ज्योतिराव फुले यांचे जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जयंत मसने होते. खासदार अनुप धोत्रे, विजय अग्रवाल, जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, राजेश बेले, डॉक्टर शंकरराव वाकोडे, संजय कोरडे, उमेश जाधव गणेश लोड, मनीष गावंडे भरत चराटे, डॉक्टर अमित कावरे, प्रवीण पाटील हगवणे, रामदास लांडे, गणेश राव तायडे, विवेक भरणे ,अंबादास उमाळे, राजू उगले, शिवलाल इंगळे, माधव मानकर, छायाताई मानकर, गजानन उंबरकार, मिलिंद राऊत, संदीप गावंडे, एडवोकेट कल्पना गोटफोडे, राजू वारूकार , पवन महल्ले , करण शाहू, अजय शर्मा सतीश ढगे, नितीन ताकवले, प्रशांत अवचार,अण्णा उबाळे प्रामुख्याने उपस्थित होते. 


दि शताब्दी वर्षानिमित्त महायुती सरकारने अनेक कार्यक्रम आयोजित केले आहे आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार घरोघरी पोहोचवण्याचं काम होणार असून कार्यकर्त्यांनी या प्रत्येक कार्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन खासदार अनुप धोत्रे यांनी केले. 

यावेळी संतोष शिवरकर, जयंत मसने, विजय अग्रवाल यांनी महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर मार्गदर्शन केले. 

कार्यक्रमाचे संचालन एडवोकेट देवाशिष काकड, प्रास्ताविक गिरीश जोशी तर आभार प्रदर्शन संजय गोटफोडे यांनी केले.

टिप्पण्या