वैशिष्ट्यीकृत

अ.भा.वि.प.च्या स्थापना दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

 



अकोला, दि. ९ जुलै : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त तसेच राष्ट्रीय विद्यार्थी दिनाच्या औचित्याने अकोला महानगरात गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अँड. गिरीश गोखले , प्रमुख वक्त्या म्हणून विदर्भ प्रांत सहमंत्री कु. रिदम शाह उपस्थित होत्या. यावेळी अ.भा.वि.प.चे महानगराध्यक्ष प्रा. दिलीप बांगर यांची प्रमुख उपस्थिती होती.




          प्रास्ताविकात प्रा. दिलीप बांगर यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थापना दिनाचे महत्त्व, विद्यार्थी परिषदेचे विविध क्षेत्रांतील कार्य, विद्यार्थी हितासाठी सातत्याने राबविण्यात येणारे उपक्रम आणि राष्ट्रनिर्माणासाठी कार्यकर्त्यांचे योगदान याविषयी मार्गदर्शन केले. तसेच सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

        

  यानंतर अकोला महानगरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये श्रेया पाटील (१००% गुण), ईशान आडे, तेजल भागवत, संस्कृती हरणे, प्रांजली महल्ले, सिद्धी राठी, आनंदी पाटील, आर्या विरोकार, भक्ती वाघमारे, नंदिनी पारस्कर, शिवम गोरे, सार्थक दांदळे, शंतनू कसूर, श्रद्धा काटे, आदिनाथ सोनवणे, प्रेम राऊत, शिव अग्रवाल, तेजस जयंती, श्रुती घोगरे, मेधावी वाकडे, देविका देशमुख, वेदिका देशमुख, गायत्री येवले, श्रावणी राजवैद्य, ऋतुजा मुकोकार, गौरव पोटले, योगिनी जायले, संचिता जाधव, अशिता अग्रवाल, गौरी पाचपोर, श्रेयस पाटील, वीर राठोड, गौरी घटले, अवनीश देशपांडे, देवांशी गावंडे, अनुश्री झाडोकार, श्रावणी पाटील, पियुष बोरकर, समीक्षा उगले, अक्षदा राठोड, जानवी ढोरे, समृद्धी भांडारकर, संचित फाटे, अनिकेत खैरे, आदित्य डोंगरे, नंदिनी पोयाम, तन्वी वाघमारे सिद्धेश वाडकर आदी विद्यार्थ्यांचा समावेश होता. यावेळी विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांचाही सत्कार करण्यात आला.

              अध्यक्षीय भाषणात अँड . गिरीश गोखले यांनी विद्यार्थी परिषदेमधील आपल्या विद्यार्थी जीवनातील अनुभव सांगितले. विद्यार्थी परिषदेमुळे नेतृत्वगुण, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रभक्तीची जाणीव अधिक दृढ झाली, असे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच समाजकार्य, राष्ट्रप्रेम, शिस्त आणि गुरुजन तसेच पालकांच्या मार्गदर्शनाचा स्वीकार करून जीवनात निश्चित ध्येय ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले. अ.भा.वि.प. ही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्य करणारी आणि विद्यार्थ्यांना नेतृत्वाची संधी देणारी संघटना असल्याचे त्यांनी सांगितले.


          प्रमुख वक्त्या कु. रिदम शाह यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विविध आयामांची माहिती देत स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी संकटांना न घाबरता आत्मविश्वासाने पुढे जावे, ध्येयवादी जीवन जगावे आणि समाजहिताची भावना जोपासावी, असा संदेश त्यांनी दिला. तसेच स्थापना दिनानिमित्त देशभरात विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती देऊन सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

                 यावेळी राष्ट्रीय कला मंचाचे प्रांत प्रमुख अविनाश तोडसाम महानगर उपाध्यक्ष प्रा. महेश भवाने, प्रा. श्रीकांत पाटील, प्रांत सहमंत्री चंद्रकांत बोबडे, तेजस्विनी रणपिसे, प्रथमेश डाकरे, ऋषी पिंजरकर, प्रणव धारवेकर, अथर्व वारकरी, हर्ष तायडे, तनय धानखेडे यांच्यासह विद्यार्थी, पालक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी रणपिसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन नगरमंत्री परीक्षित कोल्हे यांनी केले. वंदे मातरम् गायनाने कार्यक्रमाची सांगता उत्साहपूर्ण वातावरणात झाली.

टिप्पण्या