मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

आमदार सावरकरांचे निकटवर्तीय संकेत काटे यांनी व्हिएतनाममध्ये रोवला यशाचा झेंडा ! अकोला, दि. 20 ऑगस्ट 2026 : अकोला पूर्व मतदार संघाचे आमदार रणधीर सावरकर यांचे स्वीय सहाय्यक संतोष काटे यांचे चिरंजीव संकेत काटे यांना व्हिएतनामच्या दा नांग येथे बजाज ग्रुपचे अध्यक्ष शेखर बजाज आणि बजेल प्रोजेक्ट्सचे MD & CEO राजेश गणेश यांच्या हस्ते "बेस्ट परफॉर्मर अवॉर्ड" प्रदान करण्यात आला. संकेतने शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रात सातत्याने प्रगती केली आहे. मुर्तिजापूर तालुक्यातील एका छोट्याशा गावातून आलेल्या संकेतने वडिलांच्या कष्टातून आणि आई-वडिलांच्या संस्कारांवर आज मुंबई येथे आपल्या कर्तुत्वाने नाव कमावले आहे. ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेल्या या कामगिरीमुळे संपूर्ण जिल्ह्याचे नाव मोठे झाले आहे. आमदार सावरकर यांच्या शुभेच्छा ! संकेतने आपल्या कर्तृत्वाने व्हियेतनाम मध्ये प्राप्त केलेल्या पुरस्काराने अकोला जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. संकेतला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा! - आमदार रणधीर सावरकर

सामाजिक समरसतेचा संदेश देणारी भीम ज्योत यात्रा आज अकोल्यात

 



                           ( विशाल पुरंदरे)

अकोला : भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्य भारतीय जनता पक्ष अनुसूचित जाती मोर्चा च्या वतीने भारताच्या भीमज्योत यात्रेचे राज राजेश्वर नगरीमध्ये शनिवार दिनांक 18 एप्रिल रोजी आगमन होत आहे. दुपारी चार वाजता स्थानिक सिटी स्पोर्ट येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री, आमदार रवींद्र चव्हाण तसेच महाराष्ट्र प्रदेश आघाडी अध्यक्ष विश्वनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा येत आहे. या निमित्त महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती मोर्च्याचे पदाधिकारी भारताची भीम ज्योत घेऊन येणार आहेत. यानिमित्ताने मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसोबत तसेच सामाजिक समरसता म्हणून चर्चा विनिमय संवाद मेळाव्याच्या माध्यमातून घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, त्यांची कृती किती महत्त्वाची होती याचा समाजामध्ये प्रचार प्रसार व्हावा हा या मागचा उद्देश आहे. याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपाचे आमदार रणधीर सावरकर, पालकमंत्री ऍडव्होकेट आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, महानगर जिल्हाध्यक्ष जयंत मसने, अकोला महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल, महापौर शारदाताई खेडकर, श्रावण इंगळे, नगराध्यक्ष मायाताई घुले, वैशालीताई शेंडे, पालीवाल, सुलभाताई दुतोंडे, हर्षद साबळे, पंकज सावळे, पुरुषोत्तम पानझाडे, विशाल इंगळे, संतोष डोंगरे, धनंजय धबाले, सुभाष खंडारे, आम्रपाली उपरवट, बाळू उपरवट, रमेश करिहार, माधव मानकर एडवोकेट, रूपाली काकडे, राजेश नागमते अंबादास उमाळे, एडवोकेट देवाशिष काकड, संजय गोटफोडे, उज्वल बामनटे,सुनील कांबळे, मंगेश झिने, शशिकलाताई काळे आदींनी केली आहे.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट