वैशिष्ट्यीकृत
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अमरनाथ जाणाऱ्या 550 भाविकांना भाजप तर्फे आरोग्य प्रमाणपत्र वितरित
अकोला : हिमालयात वास्तव्यास असलेल्या बाबा अमरनाथ यांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या यात्रेकरूंना आरोग्य तपासणी शिबिर प्रमाणपत्र आवश्यक असते. त्या दृष्टीने भाविकांना एका छताखाली प्रमाणपत्र मिळावे यासाठी जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयात आयोजित शिबिरात 550 यात्रेकरूंना आरोग्य तपासणी करून प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
भारतीय जनता पार्टी व लेडी हार्डिंग च्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
बाबा अमरनाथ हे हिंदू भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे अमरनाथ यात्रेकरूंना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार रणधीर सावरकर यांनी केले. आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. भाविकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी डॉक्टरांचे विशेष पथक कार्यरत होते. सकाळी आठ वाजता शिबिर सुरू करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संतोष शिवरकर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून विजय अग्रवाल, जयंत मसने, पवन महल्ले, माधव मानकर, डॉ. संजय धोत्रे, डॉक्टर राठोड, डॉक्टर वंदना पटोकार , डॉक्टर थोरात, डॉक्टर तेजस सिसोदिया, डॉक्टर राम बिहाडे, डॉक्टर उमेश अग्रवाल, डॉक्टर श्रेय अग्रवाल, डॉक्टर शीतल पवार, श्रीमती हर्षा जाधव, डॉक्टर ममता ठाकरे, डॉक्टर वैशाली धांडे, लक्ष्मी मिश्रा, डॉक्टर सृष्टी देऊळगावकर, डॉक्टर आदित्य महानकर, डॉक्टर मोहम्मद अस्लम जमाल, शिवजय पिल्ले, डॉक्टर कोमल नवघरे, डॉक्टर साफिया अमान अन्सारी, दिपाली फरास, रश्मी अवचार, विजय शिवकार, अजय बघेल, अजय लखपती, अविनाश चव्हाण, प्रज्ञा खाती, कुमारी शुभांगी हिवरकर, संदीप शेगोकार, संतोष डोंगरे, प्रामुख्याने मंचावर विराजमान होते.
विविध देशांमध्ये अस्थिर वातावरण असताना सुद्धा मोदी सरकारच्या प्रयत्नामुळे देशात शांतता कायम आहे. या देशात सर्व धर्माचे उत्सव, सणवार मोठ्या उत्साहाने साजरे होत आहे. अकोला जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात अमरनाथ यात्रेकरू जात असतात. अकोल्यातील नागरिक शेगाव, तिरुपती बालाजी, पंढरपूर येथे कार सेवा करतात. अकोला शहर सांस्कृतिक शैक्षणिक, साहित्य, आरोग्य सामाजिक चळवळीचे स्थान असल्याने या जिल्ह्याला वेगळे महत्त्व असल्याचेही आमदार सावरकर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आयोजक माजी नगरसेवक गिरीश जोशी, माधव मानकर, एडवोकेट रूपाली काकडे, विवेक भरणे, संदीप गावंडे विनोद ,मगले अजय शर्मा, प्रशांत अवचार, पवन महल्ले , प्रदीप खडके विलास शेळके, दिलीप मिश्रा, तुषार भिरड, शितल जैन, रमाकांत भरकर यांनी विविध क्षेत्रातील भक्तांना एकत्रित करून या कार्यक्रमाच्या माध्यमातून सेवा प्रदान केली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंडित हेमंत शर्मा ,मनोज शाहू, राजेश्वर धोटे, राज थोरवे, राजेंद्र गिरी, अंकित थोरवे, ज्योती निमकांडे काळे प्रीती बाबाराव मिचत , योगिता अनकुरकार, पल्लवी ,भराटे, कल्याणी वराडे श्रद्धा वालोकार, मनीष बुंदीले, प्रकाश धोगलीया, अभिजीत भगत, हर्षद चौधरी, राजू बाबर, बाभुळकर सुनील बाठे, जाकीर खान, श्रीकांत गावंडे एडवोकेट यशवंत दांदळे आदींनी अथक परिश्रम घेतले.
14 एप्रिल मंगळवार रोजी पुन्हा शिबिर व रक्तदान शिबिर
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तसेच भारतीय जनता पक्षाचे नेते शेतकरी नेते आमदार रणधीर सावरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लेडी हार्डिंग हॉस्पिटल दुर्गा चौक इथे सकाळी आठ वाजता पासून रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. तसेच अमरनाथ जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी आरोग्य शिबिर चे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिर चळवळीमध्ये तसेच अमरनाथ यात्रेकरूनी प्रमाणपत्रासाठी 14 एप्रिल मंगळवार रोजी सकाळी आठ वाजता पासून दुपारी एक वाजता पर्यंत चालणाऱ्या या शिबिराचा लाभ घ्यावा अशी विनंती भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
आमदार रणधीर सावरकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहर आणि जिल्ह्यात 53 कार्यक्रम होऊन वेगवेगळे सामाजिक उपक्रम आरोग्य शिबिर तसेच समाजाला उपयोगी असे कार्यक्रम शैक्षणिक वस्तू वाटप कार्यक्रम होणार आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
लोकप्रिय पोस्ट
श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा