वैशिष्ट्यीकृत
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आ. सावरकर यांच्या प्रयत्नाने ग्रामस्थांना 15 सुविधांचा लाभ एकाच ठिकाणी
(विशाल पुरंदरे)
अकोला : ग्रामीण भागातील नागरिकांची वेळेची व पैशांची बचत व्हावी यासाठी नुकतेच पळसो बढे येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ग्रामस्थांना एकाच ठिकाणी पंधरा सुविधांचा लाभ देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला असे प्रतिपादन आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
पुढे बोलताना आमदार सावरकर म्हणाले की, ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी ग्रामीण पांदण रस्ते, शेतकऱ्याला मदत असे अनेक उपक्रम या महायुती सरकारने सुरू केले आहे. त्यामुळे ग्रामीण, शेतकरी, मध्यमवर्गीय कामगार यांना केंद्रबिंदू मानून शासन कार्यरत आहे.
राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेला दिशा दिली. त्यानंतर महात्मा गांधी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुद्धा या संदर्भात दिशादर्शक मार्गदर्शन केले. परंतु काँग्रेसने या दृष्टीने कोणतेही पाऊल उचलले नाही, त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था हळूहळू कमी होऊन शहरीकरणाचा विस्तार झाला. शिबिरामध्ये महसुलातील 15 सुविधांचा लाभ एकाच ठिकाणी देण्यात आला.
पळसो बडे या पंचकोशीतील शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन तातडीने निकाली काढण्याचे निर्देश आमदार रणधीर सावरकर यांनी दिले. यावेळी आमदार सावरकर यांनी सरकारी योजनेचा लाभ घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले. अधिकाऱ्यांना जनतेच्या समस्या जाणून घेऊन पीडित वंचित नागरिकांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत करण्याचे निर्देश दिले.
यावेळी कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी शरद जावळे, तहसीलदार कुणाल झाल्टे अकोला, नायब तहसीलदार संतोष शिंदे, संजय गांधी विभागाचे विश्वजीत लिंगायत,निरीक्षण अधिकारी पुरवठा विभाग, शेख अन्सारोद्दीन, मंडळ अधिकारी धनश्री पाटकर, गणेश मोरे, नरेंद्र वानखडे, भारती, इंगळे एडी घोगरे, आर ए मसने प्रामुख्याने होते. यावेळी ग्रामस्थ आणि भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
लोकप्रिय पोस्ट
शिवाजी महाविद्यालयात अकरावीच्या विद्यार्थ्यांचे थाटात स्वागत !
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा