मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

  बावनकुळे मंत्री नाही तो ठेकेदार आहे आमदार नितीन देशमुख यांच्या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक  अकोला, दि. 8 ऑक्टोबर 2026 : बाळापूर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख (उबाठा गट) यांनी महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल बेताल व बदनामीकारक वक्तव्य केल्याचा भाजपचा आरोप आहे. त्यामुळे संतप्त भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना  निवेदन देऊन आमदार नितीन देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. हे निवेदन जिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि पोलीस निरीक्षक, सिव्हील लाईन पोलीस ठाणे, अकोला यांना देण्यात आले आहे. याप्रसंगी माजी आमदार बळीराम सिरस्कार यांच्या नेतृत्वात रमण जैन, किशोर कुचके, नितीन लांडे, गणेश गाडगे, नरेश फुरंगे, चंद्रकांत अंधारे, कपिल खरप, विजय फुकट, अजिंक्य राऊत, राजूभाऊ उगले, अजय ढोणे, मंगेश भरणे, योगेश पटोकार, माधव म्हैसने, विक्की वडतकार, अक्षय भाकरे, कैलास इंगळे उपस्थित होते.  प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार 07 ऑक्टोबर 2026 रोजी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आमदार नितीन देश...

पावसाळ्यापूर्वी 144 मोठ्या नाल्यांची युद्धपातळीवर सफाई करा: गिरीश जोशी

  



अकोला : पावसाळा सुरू होण्यास केवळ एक महिना शिल्लक असल्याने अकोला शहरातील 144 मोठ्या नाल्यांची साफसफाई युद्धपातळीवर सुरू करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक व भाजप प्रसिद्धीप्रमुख गिरीश कुमार जोशी यांनी केली आहे. 


जोशी म्हणाले, "मनपा आयुक्त, महापौर व सभापती यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन सफाई मोहिमेला गती द्यावी. राज्यात इतरत्र नाले सफाई अभियान सुरू झाले असून अकोल्यात मात्र अद्याप कामाला वेग आलेला नाही."


या भागात पाणी साचण्याची समस्या

 

मोठी उमरी, गीता नगर, शिवसेना वसाहत, डाबकी रोड, रणपिसे नगर, अकोट फाईल, न्यू तापडिया नगर, खरप परिसर, दुर्गा चौक, खडकी या भागांमध्ये पावसाळ्यात घरांमध्ये व रस्त्यावर पाणी साचते. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.


हद्दवाढ भागाचाही समावेश करा  


शहरातील हद्दवाढ क्षेत्रासह अकोला महानगरात एकूण 144 नाले आहेत. या सर्व नाल्यांच्या सफाईकडे 7 जूनपूर्वी लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी जोशी यांनी केली.


सकाळीच राबवा मोहीम 


अकोल्यात सध्या उष्णतेची लाट आहे. कामगारांच्या आरोग्याचा विचार करून नाले सफाई मोहीम पहाटे किंवा सकाळच्या वेळेत राबवावी, असेही जोशी यांनी सुचवले. 

टिप्पण्या