मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

अ.भा.वि.प.च्या स्थापना दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

  अकोला, दि. ९ जुलै : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त तसेच राष्ट्रीय विद्यार्थी दिनाच्या औचित्याने अकोला महानगरात गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अँड. गिरीश गोखले , प्रमुख वक्त्या म्हणून विदर्भ प्रांत सहमंत्री कु. रिदम शाह उपस्थित होत्या. यावेळी अ.भा.वि.प.चे महानगराध्यक्ष प्रा. दिलीप बांगर यांची प्रमुख उपस्थिती होती.           प्रास्ताविकात प्रा. दिलीप बांगर यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थापना दिनाचे महत्त्व, विद्यार्थी परिषदेचे विविध क्षेत्रांतील कार्य, विद्यार्थी हितासाठी सातत्याने राबविण्यात येणारे उपक्रम आणि राष्ट्रनिर्माणासाठी कार्यकर्त्यांचे योगदान याविषयी मार्गदर्शन केले. तसेच सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.            यानंतर अकोला महानगरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये श्रेया पाटील (१००% गुण), ईशान आडे, तेजल भा...

आ. साजिद खान पठाण यांना जीवे मारण्याची धमकी

 


वाई प्लस’ सुरक्षेची काँग्रेसची मागणी ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 

अकोला : अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याच्या गंभीर प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रशासनावर जोरदार दबाव आणत तात्काळ ‘वाई प्लस’ (Y+) दर्जाची सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.

जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर व महानगर अध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देत संताप व्यक्त केला.


 “लोकप्रतिनिधींनाच धमक्या मिळत असतील तर सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षा कोण करणार?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. अलीकडे गुन्हेगारी टोळ्यांकडून, विशेषतः कथित बिश्नोई गँगकडून धमक्या दिल्या जात असल्याच्या घटनांनी राज्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आमदार पठाण यांना मिळालेली धमकी ही केवळ एका व्यक्तीविरुद्धची बाब नसून लोकशाही व्यवस्थेलाच दिलेले आव्हान असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले. 


निवेदनात आमदार पठाण यांना तात्काळ उच्चस्तरीय पोलीस सुरक्षा देण्याची, विद्यमान सुरक्षेचा आढावा घेऊन ‘वाई प्लस’ दर्जासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची तसेच धमकी देणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून राज्य व केंद्रीय गुप्तचर यंत्रणांशी समन्वय साधण्याचीही मागणी करण्यात आली.

दरम्यान, या घटनेमुळे अकोला जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाने तात्काळ ठोस पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली आहे. 


यावेळी बबनराव चौधरी, प्रदीपकुमार वखारिया, कपिल रावदेव, तश्वर पटेल, मो. युसुफ मो. इलियास, विजय पचारे, मोहम्मद इरफान, शे. इब्राहिम शे. कासम, याकूब खान, हुसेन चौधरी, मोईन खान, मेहबूब खान, आर्किटेक निलोफर खान सोहेल खान, निखत शाहीन अहमद कुरेशी, कनिश खातून मो. इलियास, आर्शिया परवीन मो. शारिक, सैय्यद यासीन, शेख अब्दुल्लाह, सैय्यद अहमद, सैय्यद शहजाद सज्जू भाई यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या