मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

अ.भा.वि.प.च्या स्थापना दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

  अकोला, दि. ९ जुलै : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त तसेच राष्ट्रीय विद्यार्थी दिनाच्या औचित्याने अकोला महानगरात गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अँड. गिरीश गोखले , प्रमुख वक्त्या म्हणून विदर्भ प्रांत सहमंत्री कु. रिदम शाह उपस्थित होत्या. यावेळी अ.भा.वि.प.चे महानगराध्यक्ष प्रा. दिलीप बांगर यांची प्रमुख उपस्थिती होती.           प्रास्ताविकात प्रा. दिलीप बांगर यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थापना दिनाचे महत्त्व, विद्यार्थी परिषदेचे विविध क्षेत्रांतील कार्य, विद्यार्थी हितासाठी सातत्याने राबविण्यात येणारे उपक्रम आणि राष्ट्रनिर्माणासाठी कार्यकर्त्यांचे योगदान याविषयी मार्गदर्शन केले. तसेच सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.            यानंतर अकोला महानगरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये श्रेया पाटील (१००% गुण), ईशान आडे, तेजल भा...

गिरीश जोशी यांच्या संकलपनेतून मोठ्या राम मंदिरात नैसर्गिक रंग आणि फुलांची होळी

 


अकोला : संत गजानन महाराजांच्या पादस्पर्शाने पवित्र मोठे राम मंदिर येथे नैसर्गिक रंग व फुलांची होळी साजरी करण्यात आली.

वृंदावन मथुरा येथून नैसर्गिक रंग अयोध्या येथे जातात आणि अयोध्या येथे त्या रंगातून होळी खेळण्यात येते. त्याच धर्तीवर पंचवीस वर्षांपूर्वी श्री जानकी वल्लभो धर्मार्थ संस्था श्रीराम हरिहर संस्था, पुष्करणा चेतना समिती, श्रीराम नगर मित्र मंडळ च्या वतीने नैसर्गिक रंग आणि फुलांची होळी या परंपरेनुसार मातृ शक्ती युवाशक्ती सर्व वर्गातील नागरिकांच्या सहकार्याने हा अभिनव कार्यक्रम करण्यात आला.

आरंभी मंदिराच्या अध्यक्षा सुमन देवी अग्रवाल यांच्या शुभहस्ते श्रीराम व कृष्ण प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच राजस्थानी ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष विजय तिवारी, कैलास बोहरा(खामगांव), राधेश्याम शर्मा, अमरचंदजी जोशी , पंडित सौरभ छांगाणी, पंडित महेशजी जोशी, पंडित हेमंत शर्मा, किसनगोपाल(हरि इच्छा) पुरोहित, महेंद्र पुरोहित यांनी पूजा अर्चना केली. 




होली के रसिया, आठ वर्ष कृष्ण कन्हैया सोला बरस की राधा राणी, श्याम आज बिरज मे होली रे रसिया, खाटू नरेश श्यामबाबा, श्रीरामदेवबाबा , राधा राणी यांची भजने गाण्यात आली. कृष्ण आणि राधांच्या होळी संदर्भात संवाद भजने खामगाव येथून आलेल्या गायकांनी तसेच राधाकृपा सत्संग मंडळांनी गात भक्तांना मंत्रमुग्ध केले. ‌ 

सतत पंचवीस वर्षापासून गिरीश जोशी यांच्या कल्पनेतून ही होळी करण्यात येते. यामध्ये गिरीराज तिवारी, अनिल मानधने ,विलास अनासने सहकारी यांच्या माध्यमातून हा अभिनव कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमात श्री अनील थानवी, दिनेश जोशी , गोपेश बोहरा, वल्लभ बोहरा, हरीश जोशी, सौरभ छांगाणी ,अशोक छांगाणी, दिलीप छांगाणी, राधेश्याम छांगाणी(खामगांव ढोलक वादक) दीपक छांगाणी (तेल्हारा), दीपक छांगाणी(तिवसा) अजय जोशी, विनय जोशी, अजय व्यास, नंदकिशोर व्यास, पुखराज छांगाणी, सुरेश व्यास, विजय व्यास , महेश जोशी, कृष्णा बोहरा, मेघराज बोहरा, एड महेंद्र व्यास, एड वीरेंद्र व्यास, शक्तिसिंह पुरोहित, गिरीश छांगाणी, कन्हैयालाल छांगाणी, रूपेश छांगाणी, तुषार पुरोहित, धर्मेश पुरोहित, जुगलकिशोर जोशी, सुबोध जोशी, पुरुषोत्तम बिस्सा, नटवरलाल पुरोहित, कमलेश पुरोहित, हितेश छांगाणी, गोविंद छांगाणी, डॉ आनंद छांगाणी गिरीराज पुरोहित, वल्लभ पुरोहीत, हुकुमचंद छांगाणी, महादेव वानरे(ढोलक वादक) कान्हा बासु, महेश दिली, नवल बानीया परिवाराने अमूल्य सेवा दिली. अकोला शहरांमध्ये दहा दिवस हा उत्सव वेगवेगळ्या ठिकाणी साजरा होणार आहे. राधा कृपा सत्संग मंडळ, पुष्करणा चेतना समिती,एकता समिती , तसेच महिला मंडल सौ पिंकी छांगाणी, राजेश्वरी छांगाणी, विमला छांगाणी, जयश्री छांगाणी, लीलादेवी छांगाणी, ममता छांगाणी, मनीषा छांगाणी, मधुबाला जोशी(नागपुर) , तारा छांगाणी, प्रगति छांगाणी, उषा छांगाणी, कंवरदेवी छांगाणी(आरवी) , संतोषदेवी पुरोहित, रूपा पुरोहित, वैष्णवी पुरोहित, पुष्पा पुरोहित, आशादेवी जोशी, सुनीता जोशी, रीता जोशी, हेमा जोशी, तुलसी जोशी, सिद्धि जोशी, विनायक शाडीलय, शीतल व्यास, साक्षी बासु, शोभादेवी बोहरा, दीपाली बोहरा, मीणा व्यास, दुर्गा बोहरा, मालती जोशी, दुर्गा व्यास, विनिता बिस्सा, विजय जोशी, विजय व्यास, बेनीया व्यास खुशी छांगाणी, जानवी बोहरा, मानवी बोहरा, वर्षा व्यास, राखी बोहरा , निधि बोहरा, दुर्गा जोशी, तेल्हारा नगर परिषद वार्ड नंबर 4 चे नगरसेविका सौ भक्ति दीपक छांगाणी, संगीता मांगटे, गुंजन धवने, राधेश्याम शर्मा, दीपक चोबे, मनोज शर्मा ,राजेश पूर्वे, सारिका देशमुख कल्पना अडचुले, महेश बगरेट, संजय अग्रवाल, चंद्रशेखर खडसे, अजय गुल्हाने, अजय शर्मा आशिष शर्मा, महेंद्र जोशी,, डॉक्टर गिरीश गांधी डॉक्टर गिरीश मंत्री, हुकुमचंद गुप्ता, आधी कार्यकर्ते सह राम भक्त आणि कृष्ण भक्त मोठ्या संख्येने सहभागी होते.

टिप्पण्या