मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

आमदार सावरकरांचे निकटवर्तीय संकेत काटे यांनी व्हिएतनाममध्ये रोवला यशाचा झेंडा ! अकोला, दि. 20 ऑगस्ट 2026 : अकोला पूर्व मतदार संघाचे आमदार रणधीर सावरकर यांचे स्वीय सहाय्यक संतोष काटे यांचे चिरंजीव संकेत काटे यांना व्हिएतनामच्या दा नांग येथे बजाज ग्रुपचे अध्यक्ष शेखर बजाज आणि बजेल प्रोजेक्ट्सचे MD & CEO राजेश गणेश यांच्या हस्ते "बेस्ट परफॉर्मर अवॉर्ड" प्रदान करण्यात आला. संकेतने शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रात सातत्याने प्रगती केली आहे. मुर्तिजापूर तालुक्यातील एका छोट्याशा गावातून आलेल्या संकेतने वडिलांच्या कष्टातून आणि आई-वडिलांच्या संस्कारांवर आज मुंबई येथे आपल्या कर्तुत्वाने नाव कमावले आहे. ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेल्या या कामगिरीमुळे संपूर्ण जिल्ह्याचे नाव मोठे झाले आहे. आमदार सावरकर यांच्या शुभेच्छा ! संकेतने आपल्या कर्तृत्वाने व्हियेतनाम मध्ये प्राप्त केलेल्या पुरस्काराने अकोला जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. संकेतला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा! - आमदार रणधीर सावरकर

संस्कृती संवर्धन समितीच्या संयोजकपदी समीर थोडगे यांची नियुक्ती

 


अकोला : शहरातील सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय कार्य करणाऱ्या संस्कृती संवर्धन समितीच्या संयोजकपदी समीर थोडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे समितीच्या कार्याला नवचैतन्य मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.


समितीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना दृढ करणे, तसेच भारतीय परंपरा, संस्कृती आणि सण-उत्सवांचे महत्त्व जागृत करणे हे प्रमुख उद्दिष्ट राहणार आहे. समाजात सांस्कृतिक जाणीव वाढवून एकात्मतेचा संदेश देण्याचा समितीचा प्रयत्न असतो.


समीर थोडगे यांनी यापूर्वीही सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून विविध उपक्रमांच्या यशस्वी आयोजनात त्यांचा पुढाकार राहिला आहे. हिंदू नववर्ष स्वागत यात्रा, अखंड भारत दिन आणि महालक्ष्मी आरास स्पर्धा यांसारखे उपक्रम मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.


तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आगामी काळात विविध सामाजिक, सांस्कृतिक व जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या कार्यक्रमांद्वारे समाजात राष्ट्रनिष्ठा व सांस्कृतिक अभिमान अधिक दृढ करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.


नियुक्तीच्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष प्रा. नितीन बाठे, माजी अध्यक्ष डॉ. आर. बी. हेडा, डॉ. पार्थ सारथी शुक्ल, अरविंद देठे, विनोद देव, निलेश देव, रामप्रकाशजी मिश्रा आणि महेश जोशी, यांच्यासह स्वानंद कोंडोलीकर, राम भिरड, मीनाक्षी अपोतीकर, शरद वाघ, सितल जैन, जस्मित ओबेरॉय, पंकज सहगल, रुपेश वाखारकर, अभय राजपूत, जय राणे, पंकज सादराणी उपस्थित होते. या प्रसंगी समितीचे सदस्य नवनिर्वाचित नगरसेवक निलेश देव यांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी समीर थोडगे यांना शुभेच्छा देत समितीच्या आगामी कार्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.


समितीच्या या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत करण्यात येत असून आगामी काळात सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट