मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

  डाबकी रोड रुंदीकरणाचे काम योग्य रीतीने करा अन्यथा शिवसेना स्टाईलने... गेल्या 18 महिन्यापासून डाबकी रोड रुंदीकरणाचे काम कसे सुरू आहे हे आपल्या अधिकाऱ्यांनी कधी पहिले आहे का असा रोखठोक प्रश्न शिवसेना नेते डॉक्टर अशोक ओळंबे यांनी मनपा आयुक्त सुनील लहाने यांना विचारला आहे. कारण डाबकी रोड रुंदीकरणाचे काम 18 महिन्यांपासून अर्धवट असून ज्या ठिकाणी होत आहे त्याचे दोन्ही बाजूला रस्ता 3 मीटर, पाणी पुरवठा लाईन, नंतर इलेक्ट्रिक केबल आणि नाली असे काम होत आहे. त्यांनतर पाईप लाईन वर पेव्हर बसविण्याचे काम सुरु आहे. आणि त्याचे खाली सुध्दा काँकरीट टाकून वरून पेंव्हर टाकण्याचा अजब प्रकार सुरू आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग ची मूळ जबाबदारी मनपाची आहे. मात्र स्वतः योग्य रीतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग न करता नागरीकांना ब्रह्मज्ञान सांगणे  कितपत योग्य आहे. आपण पेव्हर खाली काँकरीट बसविण्याचे काम थांबविण्याचे आदेश संबंधित अधिकारी, ठेकेदार यांना त्वरित द्यावे. अन्यथा शिवसेना स्टाईलने पुढील पाऊल उचलू, असा रोखठोक इशारा डॉक्टर अशोक ओळंबे यांनी दिला आहे.

यशश्री जनकल्याण फाउंडेशन व माँ सारदा ज्ञानपीठ तर्फे पालकांना वृक्ष वितरण

 



अकोला : एक वृक्ष मा के नाम उपक्रमांतर्गत यशश्री जनकल्याण फाउंडेशन च्या माध्यमातून माँ सारदा ज्ञानपीठ विद्यालय गीता नगर येथे वृक्ष वितरित करण्यात आले. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्ष वितरित करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.


 माँ सारदा यांच्या प्रतिमेचे पूजन व द्वीप प्रज्वलन करून एक पेड मा के नाम कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला.याप्रसंगी शिक्षण विभागाचे केंद्र प्रमुख गोपाल सुर्वे, वन विभाग परिक्षेत्र अधिकारी गजानन गायकवाड, माँ सारदा ज्ञानपीठ विद्यालय चे उपाध्यक्ष सत्यनारायण बाहेती, मुख्याध्यापक प्रशांत खत्री, व्यवस्थापक राहुल देशमुख व यशश्री जनकल्याण फाउंडेशन चे अध्यक्ष आकाश ठाकरे, राजेंद्र पवार अशोक कोकाटे  मंचावर उपस्थित होते.



प्रमुख पाहुणे शिक्षण विभागाचे केंद्र प्रमुख गोपाल सुर्वे यांनी प्रत्येकाने किमान एक वृक्ष लागवड करण्याचे आवाहन केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष वन परिक्षेत्र अधिकारी गजानन गायकवाड यांनी वृक्ष कसे लावायचे व कसे संगोपन करायचे या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच सत्यनारायण बाहेती यांनी स्वामी विवेकानंद यांचा आदर्श विद्यार्थ्यासमोर मांडला 


    एक पेड माँ के नाम व एक सेल्फी पेड के साथ विषय घेऊन विद्यार्थ्यांनी वृक्षा चे संगोपन करून संगोपनाची माहिती यशश्री जनकल्याण फाउंडेशन ला पुरवावी. एक वर्ष नंतर त्या विद्यार्थ्यांचा यशश्री जनकल्याण फाउंडेशन च्या वतीने मौलिक भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात येईल असे यशश्री जनकल्याण फाउंडेशन चे अध्यक्ष आकाश ठाकरे यांनी म्हटले.


 प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रशांत खत्री यांनी केले. कार्यकमाची सांगता सर्व वृक्ष विद्यार्थी व पालकांना वितरण करून करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशश्री जनकल्याण फाउंडेशन चे सदस्य तसेच माँ सारदा ज्ञानपीठ विद्यालय चेशिक्षक व कर्मचाऱ्यांचे योगदान लाभले

आभार प्रदर्शन यशश्री जनकल्याण फाउंडेशन चे अध्यक्ष आकाश ठाकरे यांनी केले.

टिप्पण्या