मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

  डाबकी रोड रुंदीकरणाचे काम योग्य रीतीने करा अन्यथा शिवसेना स्टाईलने... गेल्या 18 महिन्यापासून डाबकी रोड रुंदीकरणाचे काम कसे सुरू आहे हे आपल्या अधिकाऱ्यांनी कधी पहिले आहे का असा रोखठोक प्रश्न शिवसेना नेते डॉक्टर अशोक ओळंबे यांनी मनपा आयुक्त सुनील लहाने यांना विचारला आहे. कारण डाबकी रोड रुंदीकरणाचे काम 18 महिन्यांपासून अर्धवट असून ज्या ठिकाणी होत आहे त्याचे दोन्ही बाजूला रस्ता 3 मीटर, पाणी पुरवठा लाईन, नंतर इलेक्ट्रिक केबल आणि नाली असे काम होत आहे. त्यांनतर पाईप लाईन वर पेव्हर बसविण्याचे काम सुरु आहे. आणि त्याचे खाली सुध्दा काँकरीट टाकून वरून पेंव्हर टाकण्याचा अजब प्रकार सुरू आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग ची मूळ जबाबदारी मनपाची आहे. मात्र स्वतः योग्य रीतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग न करता नागरीकांना ब्रह्मज्ञान सांगणे  कितपत योग्य आहे. आपण पेव्हर खाली काँकरीट बसविण्याचे काम थांबविण्याचे आदेश संबंधित अधिकारी, ठेकेदार यांना त्वरित द्यावे. अन्यथा शिवसेना स्टाईलने पुढील पाऊल उचलू, असा रोखठोक इशारा डॉक्टर अशोक ओळंबे यांनी दिला आहे.

सॉफ्ट स्किल्स विकसीत करणे काळाची गरज.. डॅा वासुदेव गोलाईत

 


 नांदुरा, दि. 7 - आजच्या स्पर्धात्मक जगात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि भविष्यातील यशासाठी सॉफ्ट स्किल्स (Soft Skills) ची नितांत आवश्यकता आहे. पारंपरिक शिक्षणाबरोबरच संवाद कौशल्ये (Communication Skills), समस्या सोडवण्याची क्षमता (Problem-Solving Skills), सांघिक कार्य (Teamwork) आणि लवचिकता (Adaptability) यांसारख्या गुणांवर भर देणे काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन डॉक्टर वासुदेव गोलाईत यांनी केले. 

स्थानिक श्री पुंडलीक महाराज महाविद्यालय नांदुरा रेल्वे येथील वाणिज्य शाखेच्या वतीने प्रभारी प्राचार्य डॅा अलका मानकर व विभाग प्रमुख प्रा राहुल माहुरे यांच्या मार्गदर्शनात Student Induction Program अंतर्गत  "पुस्तकांच्या पलीकडे: विद्यार्थ्यांच्या यशात सॉफ्ट स्किल्सची आवश्यकता " या विषयावर प्रमुख वक्ते एम ई एस महाविद्यालय मेहकर येथील प्रा. डॅा. वासुदेव गोलाईत यांचे व्याख्यान आयोजित केले होते. 

सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॅा अलका मानकर होत्या. याप्रसंगी विचार मंचावर इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. दादाराव गायकवाड, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा राहुल माहुरे, मराठी विभाग प्रमुख प्रा अनंता लाहुडकर, प्रा सुप्रिया गेडाम उपस्थित होते. पाहुण्यांचा परियच प्रा राहुल माहुरे यांनी करुन दिला.

अध्यक्षीय भाषणात डॅा अलका मानकर यांनी सांगितले की, "आजचे विद्यार्थी हे उद्याचे व्यावसायिक आणि नागरिक आहेत. त्यांना केवळ तांत्रिक ज्ञान देऊन चालणार नाही, तर त्यांच्यामध्ये नेतृत्वगुण, भावनिक बुद्धिमत्ता आणि निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणेही महत्त्वाचे आहे. 

कार्यक्रमाचे संचालन प्रा सुप्रीया गेडाम यांनी तर आभार प्रदर्शन प्रा निलकेश धुर्वे यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या