मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

  डाबकी रोड रुंदीकरणाचे काम योग्य रीतीने करा अन्यथा शिवसेना स्टाईलने... गेल्या 18 महिन्यापासून डाबकी रोड रुंदीकरणाचे काम कसे सुरू आहे हे आपल्या अधिकाऱ्यांनी कधी पहिले आहे का असा रोखठोक प्रश्न शिवसेना नेते डॉक्टर अशोक ओळंबे यांनी मनपा आयुक्त सुनील लहाने यांना विचारला आहे. कारण डाबकी रोड रुंदीकरणाचे काम 18 महिन्यांपासून अर्धवट असून ज्या ठिकाणी होत आहे त्याचे दोन्ही बाजूला रस्ता 3 मीटर, पाणी पुरवठा लाईन, नंतर इलेक्ट्रिक केबल आणि नाली असे काम होत आहे. त्यांनतर पाईप लाईन वर पेव्हर बसविण्याचे काम सुरु आहे. आणि त्याचे खाली सुध्दा काँकरीट टाकून वरून पेंव्हर टाकण्याचा अजब प्रकार सुरू आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग ची मूळ जबाबदारी मनपाची आहे. मात्र स्वतः योग्य रीतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग न करता नागरीकांना ब्रह्मज्ञान सांगणे  कितपत योग्य आहे. आपण पेव्हर खाली काँकरीट बसविण्याचे काम थांबविण्याचे आदेश संबंधित अधिकारी, ठेकेदार यांना त्वरित द्यावे. अन्यथा शिवसेना स्टाईलने पुढील पाऊल उचलू, असा रोखठोक इशारा डॉक्टर अशोक ओळंबे यांनी दिला आहे.

आमदार रवींद्र चव्हाण यांच्या स्वागताची जय्यत तयारी

 



अकोला : भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष, माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण रविवार दिनांक 27 एप्रिल रोजी राज राजेश्वर नगरीमध्ये प्रथमच येत आहेत. भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे.

 अकोला ग्रामीण, अकोला शहर, अमरावती शहर अमरावती ग्रामीण, खामगाव बुलढाणा पुसद यवतमाळ वाशिम या नऊ जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांच्या संयुक्त बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचे आगमन होत आहे. पश्चिम विदर्भातील सर्व पदाधिकारी, मंत्री, आमदार लोकप्रतिनिधी तसेच जिल्हा पदाधिकारी या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. यासाठी आमदार रणधीर सावरकर यांच्या मार्गदर्शनात खासदार अनुप धोत्रे, पालकमंत्री आकाश फुंडकर, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार वसंत खंडेलवाल, किशोर पाटील, जयंत मसने विजय अग्रवाल, माधव मानकर, एडवोकेट देवाशिष काकड, संजय गोटफोडे, रमेश अलकरी, सुहासिनी धोत्रे, चंदा शर्मा, सुमन गावंडे, वैशाली निकम, वैशाली शेळके, वसंत बाचोका, गीतांजली शेगोकार, डॉक्टर अमित कावरे, गिरीश जोशी डॉक्टर अभय जैन, सिद्धार्थ शर्मा, संजय जोशी, अंबादास उमाळे, तुषार ,भिरड, गोपाल मुळे, रंजीत खेडकर, दिलीप गावंडे, नितीन राऊत अमोल गीते, नितीन नितेश पाली, गणेश लोड ,किशोर, कुचके, रमेश दुतोडे, हरीश तावरे संजय कोरडे, विठ्ठल वाकोडे, प्रशांत ठाकरे, हर्षद साबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेत आहे.

टिप्पण्या