मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

  डाबकी रोड रुंदीकरणाचे काम योग्य रीतीने करा अन्यथा शिवसेना स्टाईलने... गेल्या 18 महिन्यापासून डाबकी रोड रुंदीकरणाचे काम कसे सुरू आहे हे आपल्या अधिकाऱ्यांनी कधी पहिले आहे का असा रोखठोक प्रश्न शिवसेना नेते डॉक्टर अशोक ओळंबे यांनी मनपा आयुक्त सुनील लहाने यांना विचारला आहे. कारण डाबकी रोड रुंदीकरणाचे काम 18 महिन्यांपासून अर्धवट असून ज्या ठिकाणी होत आहे त्याचे दोन्ही बाजूला रस्ता 3 मीटर, पाणी पुरवठा लाईन, नंतर इलेक्ट्रिक केबल आणि नाली असे काम होत आहे. त्यांनतर पाईप लाईन वर पेव्हर बसविण्याचे काम सुरु आहे. आणि त्याचे खाली सुध्दा काँकरीट टाकून वरून पेंव्हर टाकण्याचा अजब प्रकार सुरू आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग ची मूळ जबाबदारी मनपाची आहे. मात्र स्वतः योग्य रीतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग न करता नागरीकांना ब्रह्मज्ञान सांगणे  कितपत योग्य आहे. आपण पेव्हर खाली काँकरीट बसविण्याचे काम थांबविण्याचे आदेश संबंधित अधिकारी, ठेकेदार यांना त्वरित द्यावे. अन्यथा शिवसेना स्टाईलने पुढील पाऊल उचलू, असा रोखठोक इशारा डॉक्टर अशोक ओळंबे यांनी दिला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांनी पुन्हा डोके वर काढले



अकोला : जम्मू काश्मीर मध्ये आतंकवाद्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. पहलगाम पासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावरील खोऱ्यामध्ये लपून बसलेल्या चार ते पाच दहशतवाद्यांनी अंदाधुंद फायरिंग केली. या भ्याड हल्ल्यात 27 पर्यटक ठार झाले. या हल्ल्याचा जानकी वल्लभो सरकार संस्थेने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

 यामध्ये महाराष्ट्रातील २ पर्यटकांचा समावेश आहे. दिलीप डिसले आणि अतुल मोने ही या पर्यटकांची नावे आहेत. अजून महाराष्ट्रातील दोन पर्यटक जखमी आहेत.  हल्ल्यातील मृतकांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस इंडिया आघाडीच्या सरकारचा निषेध करण्यात आला. जम्मू काश्मीरमध्ये सर्वात मोठा हल्ला करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी या घटनेची दखल घेतली असून महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरूप परत आणण्याचे आश्वासन दिले आहे.

आज अनिल मानधने यांच्या अध्यक्षतेखाली मृतकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.  प्रभू रामचंद्राच्या चरणी त्यांना सद्गती प्राप्त व्हावी व आतंकवाद्यांचा खात्मा करण्यासाठी केंद्र सरकारला ईश्वर शक्ती देवो अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. या हिंदू टार्गेट किलिंगचा बदला निश्चित घेतल्या जाईल  असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे . 

दरम्यान, गृहमंत्री अमित शहा हे सुरक्षा विभागाच्या उच्च अधिकाऱ्यासमवेत बैठक घेत असून दहशत वाद्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे. या परिसरात कडक सुरक्षा ठेवण्यात आली  आहे. 

या सभेमध्ये श्री गिरीशजी जोशी, सुमन देवी अग्रवाल, विनायक शांडील्य गुरुजी, गिरीराज तिवारी प्रशांत लोहिया श्रीधर तिवारी अजय  गुल्हाने, आशिष बजाज, माधव मानकर संजय जीरापुरे निलेश निनोरे, कविता मानधने, मीरा वानखडे ज्योती शर्मा, मालती रणपिसे, विनोद मोरे, संजय गांधी, संगीता पाटील, सुजाता गांधी, रोहित तारका, संजय देशमुख एडवोकेट धनराज ,दादळे, निकु जोशी उपस्थित होते.

टिप्पण्या