मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

  डाबकी रोड रुंदीकरणाचे काम योग्य रीतीने करा अन्यथा शिवसेना स्टाईलने... गेल्या 18 महिन्यापासून डाबकी रोड रुंदीकरणाचे काम कसे सुरू आहे हे आपल्या अधिकाऱ्यांनी कधी पहिले आहे का असा रोखठोक प्रश्न शिवसेना नेते डॉक्टर अशोक ओळंबे यांनी मनपा आयुक्त सुनील लहाने यांना विचारला आहे. कारण डाबकी रोड रुंदीकरणाचे काम 18 महिन्यांपासून अर्धवट असून ज्या ठिकाणी होत आहे त्याचे दोन्ही बाजूला रस्ता 3 मीटर, पाणी पुरवठा लाईन, नंतर इलेक्ट्रिक केबल आणि नाली असे काम होत आहे. त्यांनतर पाईप लाईन वर पेव्हर बसविण्याचे काम सुरु आहे. आणि त्याचे खाली सुध्दा काँकरीट टाकून वरून पेंव्हर टाकण्याचा अजब प्रकार सुरू आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग ची मूळ जबाबदारी मनपाची आहे. मात्र स्वतः योग्य रीतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग न करता नागरीकांना ब्रह्मज्ञान सांगणे  कितपत योग्य आहे. आपण पेव्हर खाली काँकरीट बसविण्याचे काम थांबविण्याचे आदेश संबंधित अधिकारी, ठेकेदार यांना त्वरित द्यावे. अन्यथा शिवसेना स्टाईलने पुढील पाऊल उचलू, असा रोखठोक इशारा डॉक्टर अशोक ओळंबे यांनी दिला आहे.

चार दिवसात जलकुंभी काढा गिरीश जोशी यांचा मनपायुक्तांना अल्टिमेटम

 


अकोला : मोर्णा नदीमध्ये जलकुंभी पसरल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे, या प्रश्नावरून भाजपाचे प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी आक्रमक झाले आहेत.  महानगरपालिका आयुक्तांनी येत्या चार दिवसात मोर्णा नदीवरील जलकुंभी न काढल्यास त्यांच्या निवासस्थानी नदीकाठीचे नागरिक झोपण्यासाठी अभिनव पद्धतीने आंदोलन करतील असा इशारा माजी नगरसेवक गिरीश जोशी यांनी दिला. 

अकोला महानगरपालिकेने जलकुंभी कार्ड सुरू केले आहे अशा प्रकारचा प्रचार केला, परंतु प्रत्यक्षात जलकुंभी काढण्यात आली नाही. त्यामुळे नदी काठावरील प्रभाग 10 मधील नागरिक डासांच्या त्रासापासून त्रस्त आहेत. रात्री त्यांना झोपण्यामध्ये अनेक अडचणी येत असून रोगराई पसरत आहे. या संदर्भात मनपा आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांनी कारवाई न केल्यास त्यांच्या निवासस्थानी जलकुंभी त्रस्त नागरिक  झोपण्यासाठी जन आंदोलन करतील. येत्या चार दिवसात यासंदर्भात कारवाई न केल्यास  आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. वारंवार भाजपा लोकप्रतिनिधींनी सूचना दिल्यावर सुद्धा केवळ वृत्तपत्रात प्रचार प्रसार करून जलकुंभी काढण्याचे  नाटक करण्यात येत असल्याचे भाजपाचे प्रसिद्ध प्रमुख गिरीश जोशी यांनी सांगितले.

टिप्पण्या