मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

भर उन्हात जनगणना प्रशिक्षण प्रशिक्षणार्थींचे हाल, मनपाचा ढिसाळ कारभार

                              विशाल पुरंदरे   अकोला : शहरातील जनगणना करण्यासाठी शिक्षक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक तसेच शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना सध्या प्रशिक्षण देणे सुरू आहे. प्रचंड तापमान असतानाही सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत उन्हाच्या वेळी प्रशिक्षण ठेवल्याने कर्मचाऱ्यांच्या जीवाची लाही लाही होत आहे. सध्या अकोला महापालिका दक्षिण झोन अंतर्गत स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये जवळपास 100 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. काही प्रशिक्षणार्थीं ची एसी हॉलमध्ये व्यवस्था असल्याने त्यांना अजिबात त्रास नाही. मात्र इतर प्रशिक्षणार्थींची व्यवस्था वरच्या मजल्यावर करण्यात आली, त्यामुळे प्रशिक्षणार्थींना दिवसभर घामाच्या धारा लागल्या.  दोन कुलर केवळ नावापुरता ठेवले होते. दोन्ही कुलर आपोआप बंद पडले. एवढेच काय तर ठेवलेल्या खुर्च्या मध्ये शिक्षक बसल्यानंतर जुन्या खुर्च्या तुटून शिक्षक खाली पडले. दुपारी प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केल्यानंतर अखेर एक टेक्निशियन पाठविण...

अमरावतीत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची नियोजन आढावा बैठक

 




विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचे आयोजन 


अमरावतीप्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदानाची रक्कम लवकरात लवकर अदा करावी, प्राधिकरणाचे कामकाज तातडीने सुरू करावे तसेच आर्थिक विकास महामंडळास निधी उपलब्ध करून देण्यात यावा, संघटनेच्या मागणी नुसार अमरावती विभागातील भूसंपादनाच्या प्रकरणांचा तीव्र गतीने निपटारा व्हावा यासाठी अमरावती येथे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या माध्यमातून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोज भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वात गेल्या १० वर्षांपासून विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी ऐतिहासिक संघर्ष सुरू आहे. मागील महायुतीच्या सरकारने विदर्भातील सरळ खरेदी धारक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच लाख रुपये या प्रमाणे १६६३३ हेक्टर क्षेत्रासाठी ८३२ कोटी रुपये सानुग्रह अनुदानास मंजूरी दिली होती. महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्तांसाठी आर्थिक विकास महामंडळास सुध्दा मंजुरात दिली.  अमरावती येथे प्राधिकरणाची मागणी केली होती त्यानुसार सरकारने पावले उचलुन त्याची अंमलबजावणी करावी 

यासाठी बैठकीत सर्वानुमते चर्चा करण्यात आली. महाराष्ट्राच्या विकासासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या विदर्भातील प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र धारक सुशिक्षित बेरोजगारांच्या ५% समांतर आरक्षणात वाढ करुन ते १५% करण्यात यावे  सरकारला प्रकल्पग्रस्तांना नौकरी देणें शक्य होत नसेल तर त्यांना आपले उदरनिर्वाहाचे साधन निर्माण करण्यासाठी एकमुस्त ३० लक्ष रुपये विनाअट देण्यात यावे. तसेच ५८ वर्षांवरील प्रकल्पग्रस्तांना मिनिमम पेंशन योजना सुरू करावी अशा अनेक प्रकल्पग्रस्तांच्या हक्काच्या मागण्या व ईतरही महत्त्वाच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली .चालु अधिवेशनात या संपूर्ण विषयांवर राज्याचे मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांना निवेदन देण्यासाठी संघटनेचे शिष्टमंडळ येत्या १८ व १९ तारखेला नागपूर येथे जाणार असल्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोजभाऊ चव्हाण यांनी सांगितले. गरज पडल्यास तिव्र आंदोलनाचा इशारा देखील संघटनेने दिला आहे. वऱ्हाडे मंगल कार्यालयात पार पडलेल्या बैठकीला  विदर्भातील गोंदिया, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ,अकोला, अमरावती येथील संघटनेचे जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष शाखा प्रमुख प्रकल्प प्रमुख व शेकडो कार्यकर्ते  आवर्जून उपस्थित होते.






यावेळी संघटनेचे पदाधिकारी अजय भोयर, संजय गीद.राजाभाऊ काळे प्रशांत मुरादे, गौतम खंडारे,प्रा.निलेश ठाकरे, नितीन मलमकार डॉ भगवान पंडीत, ठाकरे सर, भास्कर वानखडे, अरुण पाटील तायडे,शुभम डोनालकर, प्रमोद खाडे मनोज तंबाखे राजु लोणकर,संजय धोंडे, राजेश चौधरी, अश्र्विन होते,विजय डेहनकर विवेक डेहनकर रियाज पटेल,शरद खलोकार, नयन लुंगे प्रविण उमाळे राजु देठे, अमन भाई.अप्सर पठाण,रमेश भोयर, गणेश गावंडे, प्रशांत ठाकरे इत्यादी पदाधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.


टिप्पण्या