मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

सरळ खरेदी पद्धतीने जमीन संपादित केलेल्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा

     मुंबई : जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली 16 जून रोजी मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत सन २००६ ते २०१३ दरम्यान सरळ खरेदीधारक प्रकल्पग्रस्तांना विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने प्रति हेक्टरी पाच लक्ष सानुग्रह अनुदान मंजूर करून एकुण ८३२ कोटी रुपये दिले.  त्या प्रमाणे मृद व जलसंधारण विभागामार्फत सुद्धा सरळ खरेदी पद्धतीने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. अनावधानाने २४ सप्टेंबर दोन हजार २४ रोजी सरळ खरेदी धारक शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्या संदर्भातील परिपत्रक विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरचे वतीने निर्गमित करण्यात आले होते.त्यावेळी मृद व जलसंधारण विभागाने सरळ खरेदी पद्धतीने संपादित केलेल्या जमीनधारक शेतकऱ्यांना वगळले होते.त्यामुळे सदर शेतकऱ्यांमध्ये तिव्र नाराजी झाली होती, अशी माहिती बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी दिली. शासन तथा प्रशासन स्तरावर झालेली चुक नंतर लक्षात आली.या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथील संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मृद व जलसंधारणाचा जि....

महिलांची सुरक्षितता सर्वांची जबाबदारी

 

शिवाजी महाविद्यालयातील परिसंवादात मान्यवरांचा सूर



अकोला : अलीकडे वाढत असलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनी समाजमन ठरवून निघाले आहे.

 महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी स्थानिक शिवाजी महाविद्यालयात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. 

यामध्ये महिलांची सुरक्षितता ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रामेश्वर भिसे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर आशा मिरगे, प्रा. माया म्हैसणे उपस्थित होते. 

प्राध्यापक अस्मिता बढे यांनी कार्यक्रमाच्या औचित्याने प्रश्न विचारले. शहरात अमली पदार्थाच्या आहारी जाऊन विद्यार्थिनी, महिला आपले सर्वस्व गमावून बसतात. यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या आहेत त्यामुळे विद्यार्थिनींनी सजग राहावे असे आवाहन प्राचार्य डॉक्टर रामेश्वर भिसे यांनी केले. 

महिला आयोगाच्या माजी सदस्य डॉक्टर आशा मिरगे यांनी भूतकाळातील घटना उलगडून दाखविल्या. महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले. 

प्रा.माया म्हैसने यांनी विद्यार्थिनींनी आत्मसंरक्षणाच्या दृष्टीने प्रशिक्षण घ्यावे. आणि कोणताही परिस्थितीला घाबरून न जाता दोन हात करण्याची तयारी ठेवावी असे सांगितले. 

मोबाईल व सोशल मीडियापासून चार हात लांब राहण्याचा सल्ला मान्यवरांनी यावेळी दिला. मुलींच्या प्रश्नांचे यावेळी मान्यवरांनी निराकरण केले.

 जिल्हास्तरीय शालेय तायक्वांडो स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त कुमारी सृष्टी वाळसे हिचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. 

कार्यक्रमाचे संचालन कांचन हाडे यांनी, प्रास्ताविक सुनिता भिसे, आभार प्रदर्शन रोहिणी भालेराव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक वृंदांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

  1. आपण घेतलेला महिला वरील वाढत्या अत्याचार विषयी कार्यक्रम स्तुत्य उपक्रम आहे प्रत्येक शाळा कॉलेज नी असेच प्रोग्राम घेऊन मुली व महिलांना जागृती केले पाहिजे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा