मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

काटी, वडद संघातील कार्यकर्त्यांचा आ.सावरकर यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश

  अकोला, दि. 19 : भारतीय जनता पक्षाच्या विकासाभिमुख धोरणांवर आणि भाजपा विधिमंडळ प्रतोद आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अकोला पूर्व मतदारसंघातील काटी, वडद संघातील सधन कास्तकार गजानन अरुण चऱ्हाटे, लतीफशाह सरदारशाह, मंगेश पाटील चांदुरकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश प्रसंगी आमदार रणधीर सावरकर म्हणाले की, आज देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाला गती मिळाली आहे. शेतकऱ्यांना आधार देणाऱ्या कर्जमाफी, वीज माफी आणि विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम "देवा भाऊ" च्या नेतृत्वाखालील सरकार करीत आहे. त्यांच्याच नेतृत्वावर विश्वास ठेवून नवीन कार्यकर्ते पक्षात येत आहेत. प्रवेश करणाऱ्या सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात येईल. या वेळी जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, जिल्हा सरचिटणीस माधव मानकर, भरत चऱ्हाटे, प्रवीण हगवणे, अनिल गावंडे, राजेश बेले, गोविंद गोयंका, विवेक भरणे, विठ्ठल वाकोडे, राजेश नागमते यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यक...

पंकज कोठारी नारेडको महाराष्ट्राच्या व्यवस्थापन समितीचे सह सचिव

 



अकोला : देशातील रिअल इस्टेट क्षेत्रातील अग्रगण्य व प्रभावी संस्था असलेल्या नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल ( NAREDCO) महाराष्ट्र यांच्या व्यवस्थापन समितीवर अकोल्यातील उद्योजक, चार्टर्ड सिव्हिल इंजिनिअर व बांधकाम क्षेत्रातील अनुभवी बिल्डर, विकासक पंकज रमेशचंद्र कोठारी यांची संयुक्त सचिव (Joint Secretary) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नारेडको महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रशांत शर्मा, माजी अध्यक्ष राजन बांदेलकर तसेच चेअरमन एमेरिटस डॉ. निरंजन हिरानंदानी यांच्या स्वाक्षरीने ही नियुक्ती जयपूर येथील कार्यकमात प्रदान करण्यात आली.


नारेडको ही संस्था भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या (Ministry of Housing & Urban Affairs) मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेली रिअल इस्टेट क्षेत्रातील एक प्रमुख राष्ट्रीय संघटना आहे. देशभरातील सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील रिअल इस्टेट विकासक, बांधकाम व्यावसायिक, गुंतवणूकदार तसेच संबंधित उद्योगक्षेत्रातील विविध घटकांना एकत्र आणून या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी नारेडको कार्य करते. सध्या नारेडकोच्या राष्ट्रीय, राज्य आणि शहर स्तरावर मिळून देशभरात दहा हजारांहून अधिक सदस्य कार्यरत आहेत.


कोरोनानंतर भारतात वेगाने वाढत असलेले शहरीकरण, पायाभूत सुविधा विकास आणि गृहनिर्माण क्षेत्रातील गुंतवणूक यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर उद्योगक्षेत्र, शासन आणि विविध हितधारक यांच्यात समन्वय साधत बांधकाम क्षेत्रातील समस्या, धोरणात्मक मुद्दे आणि विकासाच्या संधी यावर नारेडको सक्रियपणे काम करत आहे.


अशा या महत्त्वाच्या संस्थेच्या राज्यस्तरीय व्यवस्थापन समितीवर पंकज कोठारी यांची नियुक्ती होणे हे अकोला व विदर्भासाठी अभिमानास्पद मानले जात आहे. त्यांच्या अनुभवाचा उपयोग राज्यातील तसेच विदर्भातील रिअल इस्टेट क्षेत्राच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात होईल, असा विश्वास नारेडकोच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.


पंकज कोठारी हे अकोल्यातील नामांकित उद्योजक, चार्टर्ड सिव्हिल इंजिनिअर, बिल्डर, मार्गदर्शक व व्यवस्थापन सल्लागार असून रिअल इस्टेट, पायाभूत सुविधा, गृहनिर्माण, पर्यटन, माहिती तंत्रज्ञान व शिक्षण या विविध क्षेत्रांत त्यांना जवळपास ३८ वर्षांचा समृद्ध अनुभव आहे. त्यांनी अनेक सामाजिक, व्यावसायिक व उद्योग संघटनांमध्ये सक्रिय भूमिका बजावत विविध विकासात्मक उपक्रमांना चालना दिली आहे.


ते नारेडको अकोला चे संस्थापक सदस्य असून राष्ट्रीय पातळीवर बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांना संघटित करण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे विदर्भातील रिअल इस्टेट क्षेत्रातील प्रश्न राज्य व केंद्र शासनाच्या स्तरावर प्रभावीपणे मांडले जातील तसेच या क्षेत्राच्या शाश्वत विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


पंकज कोठारी यांच्या या नियुक्तीबद्दल अकोला शहरातील उद्योग, व्यापार व बांधकाम क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पण्या