मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

काटी, वडद संघातील कार्यकर्त्यांचा आ.सावरकर यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश

  अकोला, दि. 19 : भारतीय जनता पक्षाच्या विकासाभिमुख धोरणांवर आणि भाजपा विधिमंडळ प्रतोद आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अकोला पूर्व मतदारसंघातील काटी, वडद संघातील सधन कास्तकार गजानन अरुण चऱ्हाटे, लतीफशाह सरदारशाह, मंगेश पाटील चांदुरकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश प्रसंगी आमदार रणधीर सावरकर म्हणाले की, आज देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाला गती मिळाली आहे. शेतकऱ्यांना आधार देणाऱ्या कर्जमाफी, वीज माफी आणि विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम "देवा भाऊ" च्या नेतृत्वाखालील सरकार करीत आहे. त्यांच्याच नेतृत्वावर विश्वास ठेवून नवीन कार्यकर्ते पक्षात येत आहेत. प्रवेश करणाऱ्या सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात येईल. या वेळी जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, जिल्हा सरचिटणीस माधव मानकर, भरत चऱ्हाटे, प्रवीण हगवणे, अनिल गावंडे, राजेश बेले, गोविंद गोयंका, विवेक भरणे, विठ्ठल वाकोडे, राजेश नागमते यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यक...

वनविभागाचा हलगर्जीपणा; आमदार अमोल मिटकरी आक्रमक

 


अकोला : अकोला जिल्ह्यातील मौजे वरखेड–सौंदळा, ता. तेल्हारा येथील शेतशिवार परिसरात वाघाच्या हालचालीमुळे निर्माण झालेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर वनविभागाच्या हलगर्जीपणाचा मुद्दा आमदार अमोल मिटकरी यांनी विधानभवनात उपस्थित केला.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलचे अकोला जिल्हाध्यक्ष विनोद मिरगे यांनी ही बाब आमदार अमोल मिटकरी यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी तात्काळ विधानभवनात हा मुद्दा उपस्थित केला.


तेल्हारा तालुक्यातील वरखेड–सौंदळा शिवारात वाघाची हालचाल


दिनांक ११ मार्च रोजी वरखेड–सौंदळा शिवारात वाघाने चार गुरे व एका डुकराची शिकार केल्याची घटना घडली. त्यानंतर वनविभागाने परिसरात कॅमेरे बसविले असता त्यामध्ये वाघाचे अस्तित्व स्पष्ट झाल्याची नोंद आहे. तसेच १३ मार्च रोजी पुन्हा त्या परिसरात वाघ आल्याचे ग्रामस्थांनी सांगितल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी वारंवार वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे वाघाला तात्काळ पकडण्याची मागणी केली. मात्र “जोपर्यंत एखाद्या माणसावर हल्ला होत नाही, तोपर्यंत वाघ पकडता येणार नाही,” अशी भूमिका संबंधित अधिकाऱ्यांनी घेतल्याची बाब समोर आली आहे.


या गंभीर प्रकाराची दखल घेत आमदार अमोल मिटकरी यांनी विधानभवनात वनविभागाच्या हलगर्जीपणाकडे सरकारचे लक्ष वेधले. नागरिकांच्या जीवितास संभाव्य धोका निर्माण झाला असताना वनविभागाने तातडीने वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी त्यांनी केली.


तसेच एखाद्या नागरिकाचा जीव जाण्याची वाट पाहणाऱ्या निष्क्रिय आणि हलगर्जी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही आमदार मिटकरी यांनी यावेळी केली.

टिप्पण्या