कॅनडात अडकलेला जसदीप सुखरूप मायदेशी परतला
आ.सावरकर यांनी केला पाठपुरावा
अकोला, दि. 27 जुलै 2026 : कॅनडात व्हिसा संपल्यामुळे अडचणीत सापडलेल्या अकोल्याच्या जसदीप सिंग ओबेरॉय याला मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस खासदार श्री. अनुप धोत्रे आणि आमदार श्री. रणधीर सावरकर यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे सुखरूप भारतात परत आणण्यात यश आले आहे.
जसदीप गेल्या काही महिन्यांपासून कॅनडात नोकरीसाठी होता. व्हिसा संपल्याने त्याची नोकरी गेली आणि आर्थिक अडचणीत सापडल्याने त्याला डिटेन करून 1 वर्षाचा रिमूव्हल ऑर्डर देण्यात आला होता.
जसदीपच्या वडिलांनी मदतीसाठी आमदार श्री. रणधीर सावरकर यांच्याकडे धाव घेतली. आमदार सावरकर यांनी तातडीने हा विषय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि खासदार श्री. अनुप धोत्रे यांच्यापर्यंत पोहोचवला. तिघांनीही समन्वय साधून राज्य व केंद्र स्तरावरून परराष्ट्र मंत्रालयामार्फत जसदीपच्या परतीसाठी आवश्यक ती सर्व मदत केली.त्यांच्या प्रयत्नांमुळेच जसदीप सुखरूप नागपूर येथे दाखल झाला.
याबद्दल आमदार सावरकर म्हणाले, _ परदेशात अडचणीत सापडलेल्या कोणत्याही महाराष्ट्रीयन नागरिकाला मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार धोत्रे यांच्या सहकार्यामुळेच आज जसदीप सुखरूप घरी परतला आहे. मी दोघांचेही मनापासून आभार मानतो.
सुखरूप परत आल्यावर जसदीपने देखील मुख्यमंत्री, खासदार आणि आमदारांचे आभार मानले. त्यांनी मला खूप मदत केली, त्यांच्यामुळे मी आज घरी आलो असे जसदीप म्हणाला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा