मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

जाणून घ्या कशी झाली जागतिक महिला दिनाची सुरुवात - प्रा. राहुल माहुरे

  ८ मार्च हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. हा केवळ उत्सवाचा दिवस नसून महिलांच्या अधिकार, समानता आणि सन्मानासाठी झालेल्या ऐतिहासिक संघर्षांची आठवण करून देणारा दिवस आहे. स्त्रीच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक योगदानाचा गौरव करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. आंतरराष्ट्रीय महिला दिनाची सुरुवात विसाव्या शतकाच्या प्रारंभी महिलांच्या हक्कांसाठी झालेल्या चळवळीमधून झाली. २८ फेब्रुवारी १९०९ रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे “सोशलिस्ट पार्टी ऑफ अमेरिका” या संघटनेने पहिल्यांदा राष्ट्रीय महिला दिवस साजरा केला. याच काळात औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी कामाचे तास, वेतनातील समानता आणि मतदानाचा अधिकार यासाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलने केली. काही इतिहासकारांच्या मते १८५७ मध्ये वस्त्रोद्योगातील महिला कामगारांनी केलेल्या आंदोलनातून या चळवळीचे बीज पेरले गेले. यानंतर १९१० मध्ये डेन्मार्कच्या कोपनहेगन येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत ८ मार्च हा दिवस महिलांच्या सन्मानासाठी साजरा करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या परिषदेत १७ देशांतील शंभराहून...

सर्वसामान्यांच्या अपेक्षांना न्याय देणारा अर्थसंकल्प




मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सर्वसामान्यांच्या अपेक्षांना न्याय देणारा आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत दिलेल्या शब्दाची पूर्तता या अर्थसंकल्पातून होत असल्याने शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावणाऱ्या विविध योजना व विकासाभिमुख निर्णयांमुळे महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेने नेणारा हा दूरदृष्टीचा अर्थसंकल्प ठरेल.


---- आमदार अमोल मिटकरी

टिप्पण्या