मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

काटी, वडद संघातील कार्यकर्त्यांचा आ.सावरकर यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश

  अकोला, दि. 19 : भारतीय जनता पक्षाच्या विकासाभिमुख धोरणांवर आणि भाजपा विधिमंडळ प्रतोद आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अकोला पूर्व मतदारसंघातील काटी, वडद संघातील सधन कास्तकार गजानन अरुण चऱ्हाटे, लतीफशाह सरदारशाह, मंगेश पाटील चांदुरकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश प्रसंगी आमदार रणधीर सावरकर म्हणाले की, आज देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाला गती मिळाली आहे. शेतकऱ्यांना आधार देणाऱ्या कर्जमाफी, वीज माफी आणि विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम "देवा भाऊ" च्या नेतृत्वाखालील सरकार करीत आहे. त्यांच्याच नेतृत्वावर विश्वास ठेवून नवीन कार्यकर्ते पक्षात येत आहेत. प्रवेश करणाऱ्या सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात येईल. या वेळी जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, जिल्हा सरचिटणीस माधव मानकर, भरत चऱ्हाटे, प्रवीण हगवणे, अनिल गावंडे, राजेश बेले, गोविंद गोयंका, विवेक भरणे, विठ्ठल वाकोडे, राजेश नागमते यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यक...

मी पाहिलेले धिवरे साहेब

 


मी गेल्या कित्येक वर्षापासून अकोल्यात पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहे. 

सुधीर धिवरे साहेब सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता म्हणून रुजू झाले होते. मी बातमीच्या निमित्ताने अधून मधून भेटीला जात असे. एवढ्या मोठ्या पदावर अधिकारी असून सुध्दा स्वभाव एकदम साधा. काही लोक असे असतात की त्यांची भेट झाल्यावर आनंद होतो. धिवरे साहेब त्यातीलच एक. अगदी दिलखुलास व्यक्तिमत्त्व. विविध क्षेत्रातील, विविध विषयांचा सखोल अभ्यास. एवढे असूनही अजिबात गर्व नाही. भेटीला आलेल्या प्रत्येकाचे म्हणणे ते ऐकून घेत. अशा माणुसकी धर्म जोपासणाऱ्या अधिकाऱ्यांची आज देशाला गरज आहे. मध्यंतरी सरांना फोन केला तेव्हा ते जळगाव खानदेशला होते. आज अचानक आठवण झाली...फोन लावून पहिला. साहेब म्हणाले मी सेवानिवृत्त होऊन चार वर्ष झाले. सेवानिवृत्त झाले हे वास्तव असले तरी मनाला पटत नाही. ते दिवस पुन्हा आठवले.. सा.बा.विभागात कार्यकारी अभियंता चेंबर समोर पांढरी शुभ्र कार वेगात यायची. साहेब झपझप पावले टाकत त्यांच्या कक्षात जात. मागून शिपाई त्यांची बॅग घेऊन जात असे. ते चित्र पुन्हा डोळ्यासमोर उभे राहिले, साहेबांच्या आठवणी एखाद्या चित्रपटातील दृष्याप्रमाने जिवंत झाल्या. आता पुन्हा कधी भेट होईल? पुन्हा तशाच गप्पा मारता येतील? साहेब आता कसे असतील? असे अनेक प्रश्न पुन्हा उभे राहिले.

टिप्पण्या