मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

काटी, वडद संघातील कार्यकर्त्यांचा आ.सावरकर यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश

  अकोला, दि. 19 : भारतीय जनता पक्षाच्या विकासाभिमुख धोरणांवर आणि भाजपा विधिमंडळ प्रतोद आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अकोला पूर्व मतदारसंघातील काटी, वडद संघातील सधन कास्तकार गजानन अरुण चऱ्हाटे, लतीफशाह सरदारशाह, मंगेश पाटील चांदुरकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश प्रसंगी आमदार रणधीर सावरकर म्हणाले की, आज देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाला गती मिळाली आहे. शेतकऱ्यांना आधार देणाऱ्या कर्जमाफी, वीज माफी आणि विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम "देवा भाऊ" च्या नेतृत्वाखालील सरकार करीत आहे. त्यांच्याच नेतृत्वावर विश्वास ठेवून नवीन कार्यकर्ते पक्षात येत आहेत. प्रवेश करणाऱ्या सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात येईल. या वेळी जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, जिल्हा सरचिटणीस माधव मानकर, भरत चऱ्हाटे, प्रवीण हगवणे, अनिल गावंडे, राजेश बेले, गोविंद गोयंका, विवेक भरणे, विठ्ठल वाकोडे, राजेश नागमते यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यक...

आदिवासी, पारधी बांधवांच्या रंगोत्सवात आमदार सावरकर सहभागी

 



अकोला : भारतीय जनता पक्षाचे आमदार रणधीर सावरकर यांनी अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील तांडा वस्ती, पारधी वाडा, देवरी फाटा येथे होळी व रंगपंचमीचा उत्सव साजरा केला.


राष्ट्रीय स्वयंसेवकसंघाच्या शताब्दी वर्षांमध्ये पीडित, वंचित समाज बांधवांसोबत आदिवासी समाजासोबत होळी साजरी करून त्यांनी नवा आदर्श प्रस्थापित केला. गेल्या दहा वर्षापासून सातत्याने ही परंपरा आमदार सावरकर अंगीकार करत आहे.  


शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबध्द


यावेळी बोलताना शेतकऱ्यांच्या विकासासाठी भाजप सरकार कटिबद्ध असल्याचे आमदार रणधीर सावरकरांनी सांगितले. त्याचप्रमाणे तळागाळातील नागरिकांचा सर्वांगीण विकास होणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. वर्षभरातील रुसवे फुगवे विसरून सर्वांनी एकत्र यावे हाच रंग पंचमी साजरी करण्याचा उद्देश आहे असे ते म्हणाले.


मिठाईचे केले वाटप 


याप्रसंगी अमरसिंग भोसले, विजयसिंह सोळंके, विवेक भरणे, राजेश नागमते, मधुकर पाटकर, विनोद मंगले, किशोर सरोदे, विठ्ठल वाकोडे, प्रवीण डिक्कर उपस्थित होते. आमदार सावरकर यांनी मिठाई वाटून उपस्थितांचा आनंद द्विगुणित केला.

टिप्पण्या