मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

काटी, वडद संघातील कार्यकर्त्यांचा आ.सावरकर यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश

  अकोला, दि. 19 : भारतीय जनता पक्षाच्या विकासाभिमुख धोरणांवर आणि भाजपा विधिमंडळ प्रतोद आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अकोला पूर्व मतदारसंघातील काटी, वडद संघातील सधन कास्तकार गजानन अरुण चऱ्हाटे, लतीफशाह सरदारशाह, मंगेश पाटील चांदुरकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश प्रसंगी आमदार रणधीर सावरकर म्हणाले की, आज देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाला गती मिळाली आहे. शेतकऱ्यांना आधार देणाऱ्या कर्जमाफी, वीज माफी आणि विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम "देवा भाऊ" च्या नेतृत्वाखालील सरकार करीत आहे. त्यांच्याच नेतृत्वावर विश्वास ठेवून नवीन कार्यकर्ते पक्षात येत आहेत. प्रवेश करणाऱ्या सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात येईल. या वेळी जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, जिल्हा सरचिटणीस माधव मानकर, भरत चऱ्हाटे, प्रवीण हगवणे, अनिल गावंडे, राजेश बेले, गोविंद गोयंका, विवेक भरणे, विठ्ठल वाकोडे, राजेश नागमते यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यक...

नगरसेवक गिरीश गोखलेंकडून अकोलेकरांच्या अपेक्षा वाढल्या

 



अकोला : भारतीय जनता पार्टीतर्फे नुकतीच अकोला महानगरपालिकेत स्वीकृत सदस्य पदी गिरीश गोखले यांची नियुक्ती करण्यात आली. महानगरपालिकेत एक अभ्यासपूर्ण नेता आल्याने अकोलेकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यांच्या नियुक्तीनंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया.


अकोट स्टॅन्ड रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी


माणिक टॉकीज ते अग्रसेन चौकापर्यंत डांबरी रस्त्याची अक्षरशा चाळणी झाली आहे. रस्ता खराब झाल्याने कित्येकदा किरकोळ अपघात होतात. हा रस्ता त्वरित नव्याने तयार करावा. त्याचप्रमाणे निदान दोन-तीन दिवसातून एकदा का होईना नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा. शहरातील मोकाट कुत्रे, वराहांचा बंदोबस्त करण्यात यावा. तसेच शहरात स्वच्छता राखण्यात यावी, या दृष्टीने गोखले प्रयत्न करतील अशी आशा आहे. त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी कोटी कोटी शुभेच्छा !


- एडवोकेट मोतीसिंह मोहता, ज्येष्ठ विधीज्ञ, अध्यक्ष बेरार एज्युकेशन सोसायटी अकोला

---------------------------------


मोठमोठे उद्योग अकोल्यात यावेत असे मनपाने धोरण आखावे


 अकोला शहरात बेरोजगारीची समस्या मोठी आहे. त्यासाठी मोठमोठे उद्योग अकोला शहरात येणे गरजेचे आहे. त्यामुळे नवीन उद्योगांना कारखाना सुरू करताना सोईस्कर होईल या दृष्टीने अकोला महापालिकेने धोरण आखावे. पुढे जास्तीत जास्त शक्य असतील त्या सवलती द्याव्या, जेणेकरून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. ही बाब नवनिर्वाचित स्वीकृत सदस्य गिरीश गोखले महापालिकेत मांडतील अशी अपेक्षा आहे.

 - पंकज कोठारी

विदर्भातील ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक

---------------------------------


गिरीश गोखले म्हणजे

 दिलेला शब्द पाळणारा माणूस


स्वीकृत सदस्याच्या रूपात एक निर्भीड अभ्यासपूर्ण नेता अकोला महानगरपालिकेला लाभला आहे. नागरिकांना जन्म मृत्यूचा दाखला मिळवून देण्यापासून ते इतर कोणतेही काम करण्यासाठी सदैव तत्पर असतात. शहरातील समस्यांचा सखोल अभ्यास करून मार्गी लावण्याच्या दृष्टीने त्यांनी महापालिकेत आवाज उठवावा. त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी हार्दिक शुभेच्छा.

- पल्लवी ताई कुलकर्णी

सिनेट सदस्य, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ

---------------------------------


गिरीश गोखले यांनी प्रभागापुरता मर्यादित न राहता अकोला शहरातील विविध समस्या सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे. शहरातील पार्किंगचा प्रश्न जटिल बनला आहे. पार्किंग साठी जागोजागी व्यवस्था करण्यात यावी. त्याचप्रमाणे मोरणा नदीतील जलकुंभी काढून नदीचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, या दृष्टीने गोखले प्रयत्न करतील अशी आशा आहे.

- डॉक्टर अशोक ओळंबे

राजकीय नेते

-----------------------------------


वकील वर्गात उत्साहाचे वातावरण


एडवोकेट गिरीश गोखले यांची अकोला महापालिकेत स्वीकृत सदस्य पदी निवड झाल्याने वकील वर्गात उत्साहाचे वातावरण आहे. अकोल्यातील विविध समस्या मार्गी लावण्यासाठी त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा निश्चितच उपयोग होईल. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

एडवोकेट रवींद्र पोटे

ज्येष्ठ विधीज्ञ, अकोला

---------------------------------------


अनेकदा महान येथील काटेपूर्णा धरणात पुरेसा जलसाठा असतो. तरी देखील अकोलेकरांना पाणीपुरवठा कधी चार दिवसानंतर, कधी आठ दिवसानंतर सुरू आहे. त्यामुळे अकोले करांना नियमित दररोज पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी जोर करत आहे.

त्याचप्रमाणे कचरा संकलन करण्यासाठी दररोज घंटागाड्या विविध प्रभागात जातात. यासाठी पूर्वी मासिक 30 रुपये आकारण्यात येत होते. आता ही रक्कम वाढवून 50 रुपये महिना आकारण्यात येत आहे. स्वच्छता राखणे महानगरपालिकेची जबाबदारी असल्याने कचरा संकलन विनामूल्य करण्यात यावे, अशी नागरिकांची मागणी आहे. 


टिप्पण्या