मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

काटी, वडद संघातील कार्यकर्त्यांचा आ.सावरकर यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश

  अकोला, दि. 19 : भारतीय जनता पक्षाच्या विकासाभिमुख धोरणांवर आणि भाजपा विधिमंडळ प्रतोद आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अकोला पूर्व मतदारसंघातील काटी, वडद संघातील सधन कास्तकार गजानन अरुण चऱ्हाटे, लतीफशाह सरदारशाह, मंगेश पाटील चांदुरकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश प्रसंगी आमदार रणधीर सावरकर म्हणाले की, आज देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाला गती मिळाली आहे. शेतकऱ्यांना आधार देणाऱ्या कर्जमाफी, वीज माफी आणि विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम "देवा भाऊ" च्या नेतृत्वाखालील सरकार करीत आहे. त्यांच्याच नेतृत्वावर विश्वास ठेवून नवीन कार्यकर्ते पक्षात येत आहेत. प्रवेश करणाऱ्या सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात येईल. या वेळी जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, जिल्हा सरचिटणीस माधव मानकर, भरत चऱ्हाटे, प्रवीण हगवणे, अनिल गावंडे, राजेश बेले, गोविंद गोयंका, विवेक भरणे, विठ्ठल वाकोडे, राजेश नागमते यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यक...

पाणीटंचाईचा आढावा घ्या, टँकरची व्यवस्था करा : गिरीश जोशी

 


अकोला : अकोला जिल्ह्यात कडाक्याचे ऊन तापत आहे. खारपाणपट्ट्यात काही गावांमध्ये महिलांना लांबून पाणी आणावे लागते. शहरातील विविध भागात तसेच जिल्ह्यामध्ये पाणीटंचाई निर्माण होऊ नये या दृष्टीने प्रशासनाने ताबडतोब बैठक घेऊन त्याचे नियोजन करावे अशी मागणी भाजप नेते गिरीश जोशी यांनी केली आहे.

 या संदर्भात त्यांनी पालकमंत्री, आमदार, खासदार, महापौर यांच्याकडे मागणी केली आहे. अकोला महानगर तसेच जिल्ह्यात पाणीटंचाईग्रस्त भागाचा आढावा घ्यावा. ज्या गावांमध्ये पाणी टंचाई आहे अशा गावात टँकरचे नियोजन करण्याच्या दृष्टीने बैठक घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

गिरीश जोशी भारतीय जनता पार्टीचे अकोला जिल्हा प्रसिद्ध प्रमुख पदावर गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उष्माघात कक्ष सुरू करणे, मोरणा नदीतील वाढलेली जलकुंभी यासह विविध समाजहिताचे प्रश्न त्यांनी लावून धरले आहेत. निस्वार्थ भावनेने गिरीश जोशी करीत असलेल्या सामाजिक कार्याचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

टिप्पण्या