मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

काटी, वडद संघातील कार्यकर्त्यांचा आ.सावरकर यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश

  अकोला, दि. 19 : भारतीय जनता पक्षाच्या विकासाभिमुख धोरणांवर आणि भाजपा विधिमंडळ प्रतोद आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अकोला पूर्व मतदारसंघातील काटी, वडद संघातील सधन कास्तकार गजानन अरुण चऱ्हाटे, लतीफशाह सरदारशाह, मंगेश पाटील चांदुरकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश प्रसंगी आमदार रणधीर सावरकर म्हणाले की, आज देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाला गती मिळाली आहे. शेतकऱ्यांना आधार देणाऱ्या कर्जमाफी, वीज माफी आणि विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम "देवा भाऊ" च्या नेतृत्वाखालील सरकार करीत आहे. त्यांच्याच नेतृत्वावर विश्वास ठेवून नवीन कार्यकर्ते पक्षात येत आहेत. प्रवेश करणाऱ्या सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात येईल. या वेळी जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, जिल्हा सरचिटणीस माधव मानकर, भरत चऱ्हाटे, प्रवीण हगवणे, अनिल गावंडे, राजेश बेले, गोविंद गोयंका, विवेक भरणे, विठ्ठल वाकोडे, राजेश नागमते यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यक...

विरोधकांनी जनतेची दिशाभूल करण्याचा उद्योग त्वरित थांबवावा - गिरीश जोशी यांचा इशारा

 



अकोला : जगभरात सध्या तणावाचे वातावरण आहे. अमेरिका-इराण तणाव, मध्यपूर्वेतील अस्थिरता आणि आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किमती यामुळे ऊर्जेच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत भारताने आधीच दूरदृष्टी ठेवून तयारी केली आहे.

चार वेगवेगळ्या देशांकडून एलपीजीने भरलेली जहाजे भारताच्या दिशेने रवाना झाली आहेत. त्यामुळे देशातील गॅसचा पुरवठा सुरळीत राहावा आणि नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी केंद्र सरकारने पूर्वनियोजन केले असल्याचे स्पष्ट दिसते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने ऊर्जा सुरक्षेसाठी दीर्घकालीन धोरण स्वीकारले आहे. विविध देशांशी ऊर्जा करार, आयात स्रोतांचे विविधीकरण आणि साठवण क्षमता वाढवणे या माध्यमातून भविष्यातील संभाव्य संकटांना सामोरे जाण्याची तयारी करण्यात आली आहे.

म्हणूनच जागतिक परिस्थिती कठीण असतानाही भारतासाठी एलपीजीचा पुरवठा कायम ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता परिस्थितीचा सखोल अभ्यास करावा. विरोधकांनी विनाकारण खोट्या अफवा पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचा उद्योग त्वरित बंद करावा असा सज्जड इशारा भारतीय जनता पार्टीचे अकोला जिल्हा प्रसिद्ध प्रमुख श्री गिरीशजी जोशी यांनी दिला आहे.


टिप्पण्या