मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

काटी, वडद संघातील कार्यकर्त्यांचा आ.सावरकर यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश

  अकोला, दि. 19 : भारतीय जनता पक्षाच्या विकासाभिमुख धोरणांवर आणि भाजपा विधिमंडळ प्रतोद आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अकोला पूर्व मतदारसंघातील काटी, वडद संघातील सधन कास्तकार गजानन अरुण चऱ्हाटे, लतीफशाह सरदारशाह, मंगेश पाटील चांदुरकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश प्रसंगी आमदार रणधीर सावरकर म्हणाले की, आज देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाला गती मिळाली आहे. शेतकऱ्यांना आधार देणाऱ्या कर्जमाफी, वीज माफी आणि विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम "देवा भाऊ" च्या नेतृत्वाखालील सरकार करीत आहे. त्यांच्याच नेतृत्वावर विश्वास ठेवून नवीन कार्यकर्ते पक्षात येत आहेत. प्रवेश करणाऱ्या सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात येईल. या वेळी जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, जिल्हा सरचिटणीस माधव मानकर, भरत चऱ्हाटे, प्रवीण हगवणे, अनिल गावंडे, राजेश बेले, गोविंद गोयंका, विवेक भरणे, विठ्ठल वाकोडे, राजेश नागमते यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यक...

मी पाहिलेले संजय खडसे

 



संजय खडसे या नावाला परिचयाची गरज नाही. 'नाम ही काफी है' हे वाक्य खडसे सरांच्या बाबतीत लागू पडते. उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी अशा विविध पदांवर आपण त्यांना पाहिले. मात्र मी संजय खडसे यांच्यातला माणूस पहिला.


अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी असताना तासनतास कामात व्यस्त. टेबलवर फाईल्स चा ढिगारा पडलेला. तरी कामाचा कधी कंटाळा नाही. कितीही काम असेल मात्र समोर बसलेला शेतकरी आपल्या भेटीसाठी 60 किलोमीटर वरून आला आहे , याची जाण असणारा अधिकारी. 


माझी आणि खडसे साहेबांची पहिल्यांदा भेट कधी झाली हे नीट आठवत नाही. पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करीत असताना शेकडो अधिकारी संपर्कात आले. मात्र खडसे साहेबासारखा उमद्या मनाचा अधिकारी विरळाच. भेटीसाठी येणारे लोकप्रतिनिधी असो व्यापारी, उद्योगपती किंवा सामान्य शेतकरी सर्वांना सारखीच वागणूक. समोर बसलेला माणूस काहीतरी तक्रार किंवा मागणी घेऊन आलेला आहे. त्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्यावे एवढीच अपेक्षा असते.


 अनेक कार्यालयांचे उंबरठे झिजवून झाल्यानंतर सुद्धा तक्रारीचे निवारण झाले नाही की अनेकजण खडसे साहेबांच्या भेटीला येत. तक्रारीचे निवारण झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटत. दिवसभर सरकारी कामाचा डोलारा सांभाळून सुध्दा सामाजिक कार्याची आवड त्यांनी जोपासली आहे. 


प्रदूषण कमी करण्यासाठी पेट्रोलची गाडी न वापरता सायकल वापरा हा संदेश द्यायचा होता. त्यासाठी केवळ बोलून होणार नाही. म्हणून त्यांनी दर रविवारी सायकल चालविणे सुरू केले. पाहता पाहता अकोल्यात सायकल चालविणाऱ्या युवकांचा मोठा ग्रुप तयार झाला. 


बाळापूर येथे उपविभागीय अधिकारी असताना त्यांचे समाजाभिमुख कार्य लक्षात घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून पुरस्कृत केले.


 याव्यतिरिक्त कितीतरी संस्था, संघटनांनी त्यांचा सत्कार केला याची मोजदाद होणार नाही. एखादा प्रसिद्ध नेता, अभिनेत्यापेक्षा त्यांची लोकप्रियता कमी नाही. अशा समाजाभिमुख कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना ईश्वराने अधिक बळ द्यावे.

टिप्पण्या