अकोला : जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीला खासदार अनुप धोत्रे यांनी भेट देऊन सभापती श्री. शिरीषभाऊ धोत्रे यांच्यासोबत केंद्र सरकारद्वारे राबविण्यात येणाऱ्या शेती उपयोगी प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा केली.
अकोला जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच अल्पभूधारक शेतकरी सततच्या नापिकीला कंटाळले आहेत. आपण स्वतः शेतकऱ्यांच्या अडचणींचा अभ्यास करत असून याविषयी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य सरकार वचनबद्ध असल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी सांगितले.
यावेळी बोलताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री शिरीष भाऊ धोत्रे यांनी बाजार समितीच्या आजपर्यंतच्या कार्याचा लेखाजोखा मांडला. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी बाजार समिती नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले असल्याचे त्यांनी सांगितले.
या चर्चेत शेतकऱ्यांच्या उत्पादकतेत वाढ, शेतमाल बाजारपेठेपर्यंत सुलभ रीतीने पोहोचविणे आणि शेतीत तंत्रज्ञानाचा अधिक वापर यावर भर देण्यात आला.
या प्रसंगी राजेश बेले, वैभव माहोरे, अंकुश इंगळे, हर्षल गोंडचोर व निलेश फोकमारे उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या